भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे आशिया चषक 2022 मध्ये खेळू शकला नव्हता. परंतु आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी बुमराह संघात पुनरागमन करणार आहे. बीसीसीआयने सोमवारी (12 सप्टेंबर) जेव्हा टी-20 विश्वचषकासाठीचा संघ घोषित केला, तेव्हा बुमराहचे नाव देखील त्यामध्ये सहभागी होते. बुमराह संघात पुनरागमन करणार असल्यामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तत्पूर्वी त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यातून स्पष्ट होते की, वेगवान गोलंदाज पूर्णपणे फिट झाला आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मागच्या काही वर्षांपासून भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. अशात आशिया चषक 2022 मध्ये त्याच्या अनुपस्थितीत संघ अपेक्षित प्रदर्शन देखील करू शकला नाही. संघाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकले, पण सुपर फोरमधील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यामुळे भारत अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. आगामी टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी बुमराह संघात परतणे खूपच महत्वाचे असेल. त्याने बुधवारी (14 सप्टेंबर) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक रिल शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. बुमराह या व्हिडिओत पूर्णपणे फिट असल्याचे दिसते, ज्यामुळे चाहत्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी ठरली आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CielFWBqImr/?utm_source=ig_web_copy_link
टी-20 विश्वचषकात बुमराह भारतासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार, यात शंका नाहीये. पण त्याआधी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकांमध्ये बुमराहसह वेगवान गोलंदाज हर्षल पटेल देखील संघात पुनरागमन करणार आहे. या दोघां महत्वाच्या गोलंदाजांना या दोन्ही मालिकांमध्ये स्वतःची लय मिळवण्यासाठी मदत मिळेल.
टी-20 विश्वचषकासाठी निवडेलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जडेजाचा ‘रिकव्हरी फेज’ सुरू, उभा राहण्यासाठीही घ्याला लागतोय काठीचा आधार
शाहिद आफ्रिदीचे खळबळजनक वक्तव्य! म्हटला, विराटसाठी हीच योग्य वेळ आहे त्याने…
तब्बल 231 सामन्यांमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पंचाचे आकस्मिक निधन, क्रिकेटविश्व शोकसागरात