---Advertisement---

DCvMI: निर्णायक षटकात २ नो बॉल टाकत बुमराह ठरला खलनायक, नावे झाला लाजिरवाणा विक्रम

On: बुधवार, एप्रिल 21, 2021 7:57 AM
---Advertisement---

जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असून अनेकदा तो आपल्या गोलंदाजीने वेगवेगळे पराक्रम करत असतो. पण आयपीएल 2021 च्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. बुमराहने या सामन्यातील 19 व्या षटकात 2 बॉल नो बॉल फेकले, ज्यामुळे या सामन्यातील धावसंख्येचे अंतर कमी आले. शेवटी दिल्लीने 6 गडी राखून हा सामना जिंकला.

बुमराह हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च गोलंदाजांपैकी एक असला तरीही आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये एकूण 25 नो बॉल टाकले आहेत. या नकोशा विक्रमात त्याने एस श्रीशांतलाही मागे सोडले आहे. श्रीशांतने आयपीएलमध्ये एकूण 23 नो बॉल टाकले आहेत. याशिवाय अमित मिश्राच्या नावे 21, इशांत शर्माच्या 21 आणि उमेश यादवच्या 19 नो बॉल फेकल्याची नोंद आहे.

दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, मुंबई इंडियन्सऩे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा सोडता कोणात्याही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही आणि पुन्हा एकदा मुंबईची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. रोहित शर्माच्या 44 धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 138 केल्या.

यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राने मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून बाद केले. त्याने आपल्या चार षटकांत 24 धावा देऊन चार बळी घेतले. तसेच आवेश खान आणि ललित यादव यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. यामध्ये आवेश खानने 15 धावा देऊन 2 तर ललित यादवने 17 धावा देऊन 1 बळी मिळवला.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघातील सलामीवीर शिखर धवन 45 आणि स्टीव्ह स्मिथ 33 यांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे दिल्लीने 19.1 षटकांत चार गडी गमावून 138 धावा करत मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला.

दिल्लीच्या संघात संधी मिळलेल्या अमित मिश्राला त्याच्या शानदार गोलंदाजीबद्दल ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले. या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्समधील मुख्य फलंदाज रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड आणि ईशान किशन यांना बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या-

पराभवानंतर आणखी एक झटका; ‘या’ कारणामुळे मुंबईचा कर्णधार रोहितला तब्बल १२ लाखांचा दंड

DC vs MI : मुंबई पलटणवर दिल्लीचे शिलेदार भारी, ६ विकेट्स राखून केला पराभव

अरर थोडक्यात वाचला! पहिल्याच षटकात हार्दिकने टिपला धवनचा अप्रतिम झेल, पण… पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---