भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टिव्ही प्रेझेंटर संजना गणेशन यांचा विवाह सोहळा १५ मार्च रोजी गोव्यामध्ये पार पडला आहे. या विवाह सोहळ्यासाठी जसप्रीत बुमराहने इंग्लंड विरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. तसेच त्याला इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी२० मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता बुमराह मैदानात केव्हा परतणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
जसप्रीत बुमराहने इंग्लंड विरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. तसेच त्याला इंग्लंड विरुद्ध होत असलेल्या टी -२० मालिकेत देखील स्थान देण्यात आले नव्हते. याबरोबर वनडे मालिकेसाठी देखील तो उपलब्ध असणार नाही, याबाबत चर्चा सुरु आहे.
त्याचबरोबर, तो येत्या २६ मार्च ते २८ मार्च दरम्यान तो मुंबई इंडियन्स संघासोबत सरावासाठी उपलब्ध असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. या स्पर्धेत बुमराह मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
मुंबई इंडियन्सचे सुरुवातीचा ५ सामने चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. चेन्नईला रवाना होण्यापूर्वी बुमराहला एक आठवड्यासाठी पृथकवासात राहावे लागणार आहे. कारण बुमराह भारतीय संघाच्या बायो बबलमधून बाहेर आला आहे. तसेच भारतीय संघात खेळत असलेले खेळाडू थेट आयपीएल स्पर्धेला उपस्थित राहणार आहे. हे खेळाडू बायो बबलमध्येच आहेत.
जसप्रीत बुमराहची कारकीर्द
२९ वर्षीय बुमराहने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण १९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ८३ गडी बाद केले आहेत. तसेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत ६७ सामने खेळले आहेत. यात त्याने १०८ गडी बाद केले आहेत. तसेच ५० टी२० सामन्यात त्याने ५९ गडी बाद करण्यात त्याला यश आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने भारतीय संघासाठी खेळाच्या तीनही प्रकारात प्रमुख गोलंदाजाची भूमिका बजावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू देखील ‘मिस्टर ३६०’; भारतीय दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
जसप्रीत बुमराहचा रोमँटिक अंदाज; पत्नी संजनासह डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
केदार जाधवची नव्या प्रवासाला सुरुवात! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती






