भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात उतरला आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेक अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने जिंकली असून, फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी पहिला बळी मिळवण्यासाठी झुंजविले. मात्र, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनची आता चर्चा रंगली आहे.
या सामन्यात अफगाणिस्तान संघासाठी रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरान यांनी सलामी दिली. दोघांनी सावधगिरीने खेळत आपली विकेट वाचवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी काही चौकार मारत धावफलक पुढे नेला. मात्र , सातवे षटक टाकण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराह याने अप्रतिम चेंडू टाकत झादरान याला यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
Marcus Rashford celebration by Jasprit Bumrah. pic.twitter.com/khucbqsqo9
— Johns. (@CricCrazyJohns) October 11, 2023
या विकेटनंतर बुमराह एक खास सेलिब्रेशन करताना दिसला. त्याने इंग्लंडचा फुटबॉलर मार्कस रॅशफोर्ड याचे प्रसिद्ध सेलिब्रेशन यावेळी केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या सामन्यातचा विचार केल्यास भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल केला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळलेल्या रविचंद्रन अश्विन याला विश्रांती देत अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला संघात सामील केले गेले. तर, अफगाणिस्तानने आपला पहिला सामन्यातील संघ कायम ठेवला.
भारत प्लेईंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
(Jasprit Bumrah Copied Footballer Marcus Rasford Celebration)
हेही वाचा-
दिल्लीत टीम इंडियापुढे अफगाणी आव्हान, पाहुण्यांनी जिंकला टॉस; रोहितसेनेतून स्टार खेळाडू बाहेर- Playing XI
सचिनने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं असतं, तर भारत हरला असता! सेहवागचा 2011 वर्ल्डकपविषयी मोठा खुलासा