---Advertisement---

बुमराह ऑन फायर!! ऑली पोपला बोल्ड करत घडवला मोठा इतिहास; कपिल देव, शमी सारखे गोलंदाज पडले मागे

On: सोमवार, सप्टेंबर 6, 2021 9:29 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. हा सामना भारताने १५७ धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण इंग्लंडला २१० धावांपर्यंतच मजल मारता आली.

या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु, भारतीय गोलंदाजांनी जोरदार आक्रमण केल्यामुळे इंग्लडचे मुख्य फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान, जसप्रीत बुमराहने या डावात ऑली पोपला बाद करताच मोठा विक्रम करत इतिहास घडवला आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही सामन्यात फ्लॉप ठरला होता. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान, भारतीय संघाने दिलेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघातील मध्यक्रमातील फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु, जसप्रीत बुमराहने ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टोला बाद करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते.

ऑली पोप हा जसप्रीत बुमराहचा कसोटी क्रिकेटमध्ये १०० वा बळी ठरला आहे. यासह जसप्रीत बुमराह सर्वात कमी सामने खेळून १०० गडी बाद करणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहने २४व्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी कपिल देव आहेत. कपिल देव यांनी २५ कसोटी सामन्यात १०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तर इरफान पठाणने २८ आणि मोहम्मद शमीने २९ सामन्यात १०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.

सर्वात कमी कसोटी सामने खेळून १०० गडी बाद करणारे भारतीय वेगवान गोलंदाज 
२४ सामने – जसप्रीत बुमराह,२०२१*
२५ सामने – कपिल देव, १९८०
२८ सामने – इरफान पठाण ,२००८
२९ सामने – मोहम्मद शमी ,२०१८

महत्त्वाच्या बातम्या – 

4th Test: तब्बल ५० वर्षांनंतर ओव्हलवर झळकली भारताची विजयी पताका, इंग्लंडवर १५७ धावांनी मिळवला विजय

बुमराह @100! ऑली पोपला क्लीन बोल्ड करत धाडले माघारी, पाहा व्हिडिओ

तिसऱ्या टी२०त न्यूझीलंडचे दमदार पुनरागमन, बांगलादेशला ७६ धावांवर ऑलआऊट करत उडवला धुव्वा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---