भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील यंदाच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो की संघाला बराच प्रभावी ठरला. कांगारू संघाने दमदार सुरुवात केली. पदार्पण करणाऱ्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासने 65 चेंडूत 60 धावा करत खळबळ उडवून दिली. त्याने भारताचा सर्वात धोकादायक गोलंदाज जसप्रीत बुमराहला लक्ष्य केले आणि त्याच्याविरुद्ध धावा केल्या.
मात्र, सॅम कॉन्स्टासचा साथीदार उस्मान ख्वाजा अजूनही जसप्रीत बुमराहला खेळू शकलेला नाही. या मालिकेत ख्वाजा जसप्रीत बुमराहचा फिक्स विकेट आहे. बुमराहने उस्मान ख्वाजाला सातत्याने पायचीत केले आहे. आता मेलबर्न कसोटीतही बुमराहने ख्वाजाला बाद केले. 57 धावा केल्यानंतर पाकिस्तानी वंशाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू बुमराहचा बळी ठरला.
या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये उस्मान ख्वाजाविरुद्ध जसप्रीत बुमराहचा दबदबा पाहायला मिळत आहे. या मालिकेत आतापर्यंत ख्वाजाने बुमराहसाठी 7 डावात 87 चेंडू खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ 24 धावा केल्या आहेत आणि 5 वेळा बाद झाला आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. सुरुवातीचा पर्थ सामना भारत जिंकला, ऑस्ट्रेलियाने ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी जिंकली तर ब्रिस्बेनमध्ये खेळलेला सामना अनिर्णित राहिला.
मेलबर्न कसोटीसाठी दोन्ही संघांचे प्लेइंग- 11
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टॅन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारत- यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप
हेही वाचा-
IND vs AUS: रोहित शर्माने या फ्लॉप खेळाडूला प्लेइंग 11 मधून वगळले, घेतला धक्कादायक निर्णय
IND vs AUS: 19 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजाची आक्रमक खेळी, रचली विक्रमांची मालिका
IND vs AUS; 4483 चेंडूंनंतर जसप्रीत बुमराहला लगावले षटकार, या खेळाडूने केला हा पराक्रम