भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. बुमराहने वैयक्तिक कारण असल्याचे सांगून बीसीसीआयकडे माघार घेण्याची परवानगी मागितली होती. बीसीसीआयने ही मागणी मान्य देखील केली होती. पण बुमराहने नेमकी का माघार घेतली, हा प्रश्न अनुत्तरितच होता.
मात्र आता यामागील नेमके कारण समोर आले आहे. बुमराहने ही रजा लग्न करण्यासाठी घेतली असल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराहने आपण लग्न करत असल्याची माहिती बीसीसीआयला दिली होती. आणि त्याचीच तयारी करण्यासाठी बीसीसआयकडे रजेची मागणी देखील केली होती. ज्याला रजेला मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे आता बुमराहचे दोनाचे चार हात झाल्याची माहिती कधीही समोर येऊ शकते.
https://twitter.com/ani_digital/status/1366769438926675972?s=20
दरम्यान, जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आत्तापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात भाग घेतला होता. चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्यावरील कामाचा अतिरिक्त भार हलका करण्याच्या दृष्टीने त्याला विश्रांती देण्यात आली होती. उर्वरित दोन सामन्यात खेळतांना त्याने ४ बळी पटकावले होते.
आगामी काळात देखील बुमराह भारतीय संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी तसेच सप्टेंबर महिन्यात मायदेशातच होणारा टी-२० विश्वचषक या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी देखील त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
स्लिप मधील क्षेत्ररक्षकाने हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल, एकदा व्हिडिओ पाहाच
आयपीएलमध्ये कसा असेल चेन्नईचा संघ? ही आहे संभावित प्लेयिंग इलेव्हन






