भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर चालू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या पहिल्या डावातील १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाच्या पहिल्या डावादरम्यान फलंदाजांनी तर आपली ताकद दाखवलीच. परंतु संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील फलंदाजीत दम दाखवला. त्याच्या फलंदाजीमुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
जसप्रीत बुमराहने शेवटच्या षटकात मारलेले काही चांगले शॉट पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. बुमराहने ३४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने एकूण २८ धावा केल्या. त्यानंतर तो शेवटचा फलंदाज म्हणून बाद झाला. तर मोहम्मद सिराज ८ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ७ धावांवर नाबाद राहिला आहे.
बुमराहने इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनच्या षटकात त्याची जोरदार धुलाई केली. बुमराहने करनने टाकलेल्या ८२ व्या षटकात २ चौकार आणि १ षटकारासह एकूण १५ धावा लुटल्या होत्या. या खेळीच्या दरम्यान बुमराहने एक जबरदस्त षटकार मारला होता. त्याच्या या शॉटने सर्वांचीच मने जिंकली आहेत. बुमराहचे चौकार आणि षटकार पाहून सॅम करन मात्र खूप निराश दिसत होता.
There were critics questioning your performance a month ago.
You started & ended our bowling performance with Bumrah specials 🧡
Your batting today will just brighten up our weekend, for sure …
That 6️⃣ will remain in our ❤ forever, @Jaspritbumrah93 🔥pic.twitter.com/szXv849EVk
— North Stand Gang – Wankhede (@NorthStandGang) August 6, 2021
पहिल्या डावात भारतीय संघाने ९५ धावांची आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या डावात इंग्लंड संघाला लवकर बाद करण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर असणार आहे. जेणेकरून भारतीय संघाला छोट्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. आता हे पाहणे महत्वाचे असे की पहिल्या डावाप्रमाणेच याही डावात बुमराह उत्कृष्ट गोलंदाजी करेल का?
बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक विकेट्स चटकावल्या होत्या. त्याने ४६ धावा देत इंग्लंडच्या ४ फलंदाजांना तंबूत धाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
नॉटिंघम स्टेडियममध्ये दिसला अगदी रिषभसारखा व्यक्ती; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा तर पंतचा जुळा भाऊ’
मोक्याच्या क्षणी जिम्मीने टाकला असा काही चेंडू की, राहुलने दिली स्वत:ची विकेट; बघा व्हिडिओ
पत्रकाराच्या लांबलचक प्रश्नावर वैतागलेल्या कोहलीचे तिखट उत्तर; नेटकरी म्हणाले, ‘घनघोर अपमान’