---Advertisement---

अनिल कुंबळे प्रमाणेच जसप्रीत बुमराहने टी२०त केलाय हा मोठा विक्रम!

On: शनिवार, जानेवारी 11, 2020 4:30 PM
---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध श्रीलंका संघात शुक्रवारी(10 जानेवारी) तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे पार पडलेल्या या सामन्यात भारताने 78 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने खास विक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात 2 षटके गोलंदाजी करताना 5 धावा देत 1 विकेट घेतली. त्यामुळे आता त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 45 सामन्यात 53 विकेट्स झाल्या आहेत. त्याचमुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

त्याने या यादीत आर अश्विन आणि युजवेंद्र चहलला मागे टाकले आहे. अश्विन आणि चहल या यादीत प्रत्येकी 52 टी20 विकेट्ससह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चहलने 37 टी20 सामन्यात 52 विकेट्स घेतल्या आहेत आणि अश्विनच्या नावावर 46 टी20 सामन्यात 52 विकेट्स आहेत.

विशेष म्हणजे शुक्रवारी चहलही भारताकडून खेळत होता. त्यामुळे त्यालाही अश्विनला मागे टाकण्याची संधी होती. मात्र त्याला शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध एकही विकेट घेता आली नाही.

-आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज 

53 विकेट्स – जसप्रीत बुमराह (45 सामने)

52 विकेट्स – युजवेंद्र चहल (37 सामने)

52 विकेट्स – आर अश्विन (46 सामने)

41 विकेट्स – भुवनेश्वर कुमार (43 सामने)

39 विकेट्स – कुलदीप यादव (21 सामने)

38 विकेट्स – हार्दिक पंड्या (40 सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---