भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ चांगले प्रदर्शन करत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला. दक्षिण अफ्रिकेतील परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना फायदा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात दक्षिण अफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज एरिक सिमन्स (eric simmons) यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) याचे कौतुक केले आहे.
एरिक यांनी यावेळी बोलताना इतर भारतीय गोलंदाजांचेही कौतुक केले. त्यांच्यामते बुमराह सोबतच सर्व भारतीय गोलंदाजांचा विचार करण्याची पद्धत स्पष्ट आहे. भारतीय गोलंदाजांना माहिती असते की, सामन्यात पुढे त्यांना काय करायचे आहे आणि याच कारणास्तव त्यांना यश मिळत आहे.
जसप्रीत बुमराह खूप समजूतदार
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एरिक सिमन्स यांनी बुमराहसह इतर भारतीय गोलंदाजांच्या समजूतदारपणाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “बुमराह जगातील उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. जेव्हा मी त्याच्याविरोधात आयपीएलमध्ये खेळतो, तेव्हा मी त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. मला नाही वाटत की, लोकांना याची जाणीव असेल की, बुमराहकडे समजूतदारपणा आहे किंवा इतर भारतीय गोलंदाज किती समजूतदार आहेत.”
“भारतीय गोलंदाज त्यांच्या खेळाला चांगल्या प्रकारे जाणतात. आयपीएलमध्ये तुम्ही जगभरातील गोलंदाजांसोबत काम करता आणि तेव्हा तुम्हाला कळते की, भारतीय गोलंदाजांकडे स्पष्ट रणनीती असते. कधी-कधी ही रणनीती चुकीची देखील ठरू शकते, पण निदान तुमची कोंडी तरी होत नाही. तुम्हाला जे करायचे असते, ते पूर्णपणे स्पष्ट असते,” असे एरिक पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, जसप्रीत बुमराहचे अलिकडच्या काळातील प्रदर्शन पाहता, तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाला अनेकदा अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बुमराहने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने अनेकदा संघाला सामन्यात विजय मिळवून दिला आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटमधील त्याचे प्रदर्शन खूपच उत्तम राहिले आहे. तसेच, आयपीएलमध्येही तो चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करत आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याचे मुंबई सिटी एफसीचे लक्ष्य!
हर्षवर्धन खराडे, आदिती परशेट्टी यांना आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य
रोहित आणि मुंबई इंडियन्सचे नाते झाले ११ वर्षांचे; फ्रॅंचाईजीने शेअर केली ‘खास’ पोस्ट
व्हिडिओ पाहा –





