आयपीएलच्या आगामी हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेसाठी दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने सर्व संघाचे खेळाडू आपआपल्या ताफ्यात सामील होत आहेत. भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज व मुंबई इंडियन्सचा महत्त्वपूर्ण खेळाडू जसप्रीत बुमराह हा देखील संघाशी जोडला गेला असून, त्याने एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली.
बुमराहने शेअर केला व्हिडिओ
जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या टी२० व वनडे मालिकेसाठी भारतीय संघात नव्हता. बुमराह १५ मार्च रोजी प्रसिद्ध टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत गोवा येथे विवाहबद्ध झाला. आता तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसेल. तत्पूर्वी, तो चेन्नई येथे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. त्याने इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो व्यायाम करताना दिसून येतोय. यात तो मोठी वजने आणि डंबेल्स उचलत आहे.
https://twitter.com/Jaspritbumrah93/status/1376857031378825222?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1376857031378825222%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Ftimesofindia.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fipl%2Ftop-stories%2Fipl-2021-jasprit-bumrah-joins-mumbai-indians-squad-sweats-it-out-in-quarantine%2Farticleshow%2F81762362.cms
म्हणून बुमराह आहे क्वारंटाईन
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने या आयपीएलसाठी विशिष्ट नियमावली तयार केले आहे. त्यानुसार, इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेत सहभागी असलेल्या खेळाडूंना बायो बबलमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व खेळाडूंना सात दिवस सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल.
क्वारंटाईन कालावधी व स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंची वारंवार कोविड चाचणी घेण्यात येईल. ही संपूर्ण स्पर्धा विना प्रेक्षक आणि बंद दाराआड खेळवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग : दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी या खेळाडूची नियुक्ती, फ्रँचायझीने केली घोषणा
पश्चिम बंगाल निवडणूक : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक दिंडावर हल्ला
असे कुठे असते होय! आव्हान माहित नसतानाच फलंदाजांनी केली दिड षटके फलंदाजी