भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगत आहेत. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतल्यानंतर तो लग्न करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता हे वृत्त जवळपास नक्की झाल्यानंतर तो कोणाशी लग्नगाठ बांधणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.
गेले काही दिवस जसप्रीत बुमराह दक्षिण भारतीय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी लग्न करणार असल्याचे वृत्त होते. मात्र या केवळ अफवाच असल्याचे अनुपमा परमेश्वरन हिच्या आईने स्पष्ट केले. त्यानंतर आता बुमराहची वाग्दत्त वधू म्हणून एक नवीन नाव पुढे आले आहे.
बुमराहची नियोजित वधू आहे स्पोर्ट्स अँकर?
बुमराहची नियोजित वधू म्हणून आता एका स्पोर्ट्स अँकरचे नाव पुढे आले आहे. लोकप्रिय मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्याशी बुमराह लग्न करणार असल्याची माहिती माध्यमांमधील सूत्रांनी दिली आहे. संजना गणेशन पेशाने एक मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर असून तिने क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉल सारख्या खेळांच्या स्पर्धांमध्ये निवेदन केले आहे. २०१९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये देखील तिने काम केले आहे.
संजना गणेशनचा जन्म ६ मे १९९१ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला होता. सध्या ती २९ वर्षांची आहे. तिने कोलकता नाईट रायडर्सच्या संघाचा ‘नाईट क्लब’ हा शो देखील केला आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये कोलकाताचा संघमालक आणि दिग्गज अभिनेता शाहरूख खान देखील सहभागी झाला होता. संजनाने आयपीएल ऑक्शनचे देखील निवेदन यापूर्वी केले आहे.
मात्र या वृत्ताबाबत देखील बुमराहकडून अथवा त्याच्या कुटुंबियांकडून कुठेलाही दुजोरा देण्यात आला नाहिये. बुमराह गोव्यात निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करणार असल्याचे देखील बोलले जात होते. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाहिये.
महत्वाच्या बातम्या:
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजनपद लॉर्डस गमावणार? हे आहे कारण
INDvsENG: पंतमध्ये धोनीची आत्मा घुसली रे! त्या लाजबाव थ्रोवर सामना समालोचकही फिदा
चौथ्या कसोटीत का झाला इंग्लंडचा दारुण पराभव? ही आहेत प्रमुख कारणे