भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मोठ्या काळापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. पाठीच्या दुखण्यामुळे तो आता आगामी आयपीएलला देखील मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. हा निर्णय त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम करू शकतो.
बुमराह मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होत असलेल्या आयपीएलमधून पुनरागमन करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच आलेल्या वृत्तानुसार, बुमराह दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने आयपीएल व त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळणार नाही. त्यानंतर आता नव्याने मिळत असलेल्या माहितीनुसार, बुमराह याला या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे तो ऑगस्ट महिन्यात होत असलेल्या आशिया चषकात देखील सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, बुमराह पाठीच्या दुखापतीतून अद्याप सावरला नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याचा पुनर्वसन कार्यक्रम सुरू आहे. मात्र, त्याला बीसीसीआयच्या डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला असून, लवकरच बीसीसीआय याबाबत निर्णय घेईल. बीसीसीआयचे उद्दिष्ट त्याला आगामी विश्वचषकासाठी पूर्ण फिट करण्याचे आहे.”
बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषक व टी20 विश्वचषक या महत्त्वाच्या स्पर्धा तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर आता सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तसेच आगामी वनडे मालिकेतून त्याने माघार घेतलेली. डिसेंबर महिन्यात त्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, दुखापतीने पुन्हा एकदा उचल खाल्ल्यामुळे त्याला आपले पुनरागमन करता आले नाही.
(Jasprit Bumrah Might Miss Asia Cup 2023 BCCI Doctor Suggest One More Surgery)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीत विराट करणार खास क्लबमध्ये एन्ट्री! यापूर्वी भारताकडून फक्त द्रविडच मानकरी
इंदोर नव्हेतर थेट अहमदाबाद कसोटीचा प्लॅन करतोय रोहित! WTC फायनलबाबत म्हणाला, “तयारी आता…”