अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी टी20 विश्वचषकाआधी भारतीय संघाला जबर धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखण्यामुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र, बुमराह भारतीय संघात नसणे ही फारशी नवी गोष्ट नाही. आपल्या पदार्पणापासून तो नेहमीच विश्रांती अथवा दुखापत या कारणांमुळे 131 आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकलाय.
जसप्रीत बुमराह याने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते. तेव्हापासून तो आतापर्यंत 60 टी20 सामने खेळलाय. मात्र, त्याचवेळी 68 टी20 सामन्यांमध्ये त्याने सहभाग नोंदवला नाही. वनडे क्रिकेटचा विचार केला गेल्यास त्याच्या नावापुढे 72 सामन्यांची नोंद आहे. परंतु, 49 वनडे सामने त्याला विश्रांती अथवा आराम या कारणांमुळे संघाबाहेर राहावे लागले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देखील परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्याने 2018 पासून आत्तापर्यंत 30 कसोटीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचवेळी त्यापेक्षा जवळपास निम्म्या म्हणजे 14 सामन्यांमध्ये तो मैदानात उतरला नाही. याचाच अर्थ तो आतापर्यंत भारतासाठी विश्रांती आणि दुखापती या दोन कारणांमुळे 131 सामने खेळू शकला नाही.
याचीच दुसरी बाजू पहायला गेल्यास तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच खेळताना दिसलाय. आराम अथवा दुखापत यामुळे तो केवळ एक सामना खेळू शकला नव्हता. या दरम्यानच्या काळात त्याच्या नावे 103 आयपीएल सामन्यांची नोंद आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य देत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
बुमराह पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे जवळपास पाच ते सहा महिने मैदानावर दिसण्याची शक्यता नाही. ही दुखापत वरकरणी जास्त गंभीर नसली तरी त्याला विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
महिला आशिया चषक: टीम इंडियाची विजयी हॅट्रिक! जेमिमा-दीप्तीची तुफानी फलंदाजी
नादच खुळा! टी20 विश्वचषकात जगभरातल्या 15 पंचांसोबत एकमेव भारतीय अंपायर करणार ‘पंचगिरी’