---Advertisement---

डेल स्टेननंतर अशी कामगिरी करणारा बुमराह केवळ दुसरा गोलंदाज! 10 वर्षांत हे प्रथमच घडलं

On: शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024 4:37 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार कसोटी फलंदाज स्टीव्ह स्मिथला शून्यावर बाद करणं किती कठीण आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की स्मिथ त्याच्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत केवळ 11 वेळा खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. यापैकी फक्त दोन वेळा असं घडलं की स्मिथ गोल्डन डकचा बळी ठरला. याचाच अर्थ तो पहिल्या चेंडूवर केवळ दोनदा बाद झाला आहे. विशेष म्हणजे, हे 2014 नंतर आजच घडलं!

दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेननंतर जसप्रीत बुमराह हा स्मिथला कसोटीत गोल्डन डकवर बाद करणारा केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. डेल स्टेननं 2014 मध्ये पोर्ट एलिझाबेथमध्ये स्मिथला गोल्डन डकवर बाद केलं होतं. आता 10 वर्षांनंतर बुमराहला ही कामगिरी करता आली. बुमराहनं पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथला पहिल्या चेंडूवर बाद केलं.

स्टिव्ह स्मिथबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 110 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 56.63 च्या सरासरीनं 9685 धावा केल्या आहेत. स्मिथनं 32 कसोटी शतकं झळकावली आहेत.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला जात असून, या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडनं 4, तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्शनं प्रत्येकी 2 गडी बाद केले. नॅथन लायननं काही षटकं टाकली, पण तो एकही विकेट घेऊ शकला नाही.

प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाची अवस्थाही बिकट झाली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियानं 7 गडी गमावून 67 धावा केल्या. त्यापैकी चार विकेट बुमराहच्या नावावर, दोन विकेट मोहम्मद सिराजच्या नावावर आणि एक विकेट हर्षित राणाच्या नावावर राहिली.

हेही वाचा – 

पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट पडल्या! अखेरच्या सत्रात भारताचा जोरदार कमबॅक
ऑस्ट्रेलियात पारा चढतोय! सिराज-लाबुशेन एकमेकांशी भिडले, बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल
नितीश रेड्डीनं भारताची लाज राखली, पदार्पणाच्या कसोटीत धमाल कामगिरी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---