‘बुमराहपेक्षा कमी नाही आफ्रिदीचा जावई’, माजी क्रिकेटपटूचे मोठे भाष्य

‘बुमराहपेक्षा कमी नाही आफ्रिदीचा जावई’, माजी क्रिकेटपटूचे मोठे भाष्य

जसप्रीत बुमराह सध्या भारतीय संघातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये बुमराहला गणले जाते. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयात बुमराहचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. त्याने या सामन्यात १९ धावा खर्च करून सहा विकेट्स घेतल्या. अशात पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बट याने बुमराह आणि त्यांच्या देशाचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीची एकप्रकारे तुलना केली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे यजमान संघ अवघ्या ११० धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने एकही विकेट न गमावता सामना नावावर केला. इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेनसह इतरही काही दिग्गजांनी बुमराह या दौऱ्यातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मान्य केले आहे. परंतु पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) याच्या मते शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) देखील बुमराहच्या तोडीचा गोलंदाज आहे.

बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. तो म्हणाला की, “हे पाहा, शाहीनने खूप जास्त क्रिकेट खेळले नाहीये. परंतु तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये सहभागी आहे. तो बुमराहपेक्षा कमी नाहीये. जसजसा अनुभव येईल शाहीन उत्तम बनत जाईल. कारण त्याच्याकडे अधिकची गती आहे आणि वेगळा ऍंगलही आहे.”

बटच्या मते दोघांची तुलना होऊ शकत नाही आणि दोघेही त्यांच्या देशासाठी चांगले प्रदर्शन करत आहेत. “दोघेही जगतिक क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहेत. त्यांना गोलंदाजी करताना पाहणे, हा एक अनोखा अनुभव आहे. शाहीन आणि बुमराह दोघांनी प्रदर्शन करणे, हा एक चांगला अनुभव आहे. ज्या पद्धतीने नवीन चेंडूसह ते गोलंदाजी करताना, असे वाटते की प्रत्येक चेंडूवर विकेट मिळेल. दुसऱ्या कोणत्याच गोलंदाजाला पाहून तुम्हाला असे वाटत नाही,” असे बट पुढे बोलताना म्हणाले.

“२२ वर्षीय गोलंदाजाने अशा प्रकारचे प्रदर्शन करणे सोपे नसते. दोघेही कमालीचे गोलंदाज आहेत. यात शंका नाहीये की, बुमराह जास्त खेळला आहे आणि दोघेही कमाल प्रदर्शन करतात. पण या दोघांमध्ये कसलीही तुलना होऊ शकत नाही. एकाने खूप अधिक क्रिकेट खेळले आहे, तर एकाने मात्र नाही.”

दरम्यान, जसप्रीत बुमराहने भारतीय संघासाठी त्याचा पहिला सामना २०१६ मध्ये खेळला होता. तर दुसरीकडे शाहीन आफ्रिदीला पाकिस्तानसाठी पदार्पण करण्याची संधी २०१८ मध्ये मिळाली होती. दोघांनाही भविष्यात अजून खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आहे. या दोघांमध्ये भविष्यात स्पर्धा पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

भारताचा टर्मिनेटर हरभजन सिंग करणार क्रिकेट मैदानात पुनरागमन, पाहा कधी आणि कोणता सामना खेळणार

महाराष्ट्राचे ‘बुवा’ कबड्डीसाठी आयुष्यभर झटले, त्यांच्या जन्मदिनी साजरा होतोय ‘कबड्डी दिवस’

‘विराटपेक्षा बाबर कडून जास्त अपेक्षा’, पाकिस्तानच्या खेळाडूने केली दिग्गजांची तुलना

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.