---Advertisement---

संपुर्ण यादी- बीसीसीआयचे २०१८-१९ मोसमाचे पुरस्कार घोषित, बुमराहसह या खेळाडूंचा होणार गौरव

---Advertisement---

मुंबई | भारतीय क्रिकेट बोर्डाने आज(12 जानेवारी) 2018-19 मोसमासाठीच्या पुरस्कारांसाठीची नावे घोषित केली आहेत. त्यात या मोसमातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरूष क्रिकेटपटूचा पाॅली उम्रीगर पुरस्कार जसप्रीत बुमराहला घोषित झाला आहे.

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पुनम यादवला देण्यात येणार आहे.या पुरस्काराबरोबरच या दोघांनाही 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहेत.

बुमराहने 2018-19 मोसमात शानदार कामगिरी केली आहे. त्याने या मोसमात कसोटीमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध हॅट्रिक घेण्याचीही कामगिरी केली. त्याने या मोसमात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 21 विकेट्स घेतल्या होत्या. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली होती.

त्याचबरोबर त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकात त्याने 9 सामन्यात 18 विकेट्से घेतल्या.

तसेच पुनमनेही या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. तिने या कालावधीत 8 वनडे सामन्यात 14 विकेट्स आणि 15 टी20 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या.

त्याचबरोबर या मोसमाचा सर्वोत्तम पुरूष आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा पुरस्कार मयंक अगरवालला देण्यात आला आहे. तर सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा पुरस्कार शेफाली वर्माला जाहीर झाला आहे.

याबरोबरच सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार के श्रीकांत यांना जाहीर झाला आहे. तसेच बीसीसीआय जिवनगौरव पुरस्कार (महीला) अंजूम चोप्राला देण्यात येणार आहे. तर बीसीसीआयचा विशेष गौरव पुरस्कार दीलिप जोशी यांना देण्यात येणार आहे.

विदर्भ संघाला या मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ म्हणून गौरविण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा या स्टार क्रिकेटपटूंना या मोसमातील एकही पुरस्कार जाहीर झालेला नाही.

2018-2019 वर्षासाठी बीसीसीआयचे पुरस्कार

कर्नल सीके नायडू जिवनगौरव पुरस्कार- के श्रीकांत (25 लाख, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र)

बीसीसीआय जिवनगौरव पुरस्कार (महिला)- अंजूम चोप्रा (25 लाख, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र)

बीसीसीआय विशेष पुरस्कार – दीलिप जोशी

पाॅली उम्रीगर पुरस्कार- जसप्रीत बुमराह

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महीला क्रिकेटपटू- पुनम यादव

दिलीप सरदेसाई पुरस्कार – (कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा) – चेतेश्वर पुजारा

दिलीप सरदेसाई पुरस्कार – (कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स) – जसप्रीत बुमराह

वनडेमध्ये सर्वाधिक धावा(महिला) – स्म्रीती मंधना

वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स(महिला) – झूलन गोस्वामी

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष) – मयंक अगरवाल

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला) – शेफाली वर्मा

लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू (रणजी)- शिवम दुबे (मुंबई)

लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू (देशांतर्गत क्रिकेटमध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये)- नीतीश राणा (दिल्ली)

माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू-  मिलिंद कुमार (सिक्कीम)

माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज- आशुतोष अमन (बिहार)

जगमोहन दालमिया ट्राॅफी (देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारी महिला क्रिकेटर)- दिप्ती शर्मा (बंगाल)

सर्वाोत्तम पंच (देशांतर्गत क्रिकेट)- विरेंद्र शर्मा

यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ- विदर्भ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---