---Advertisement---

जसप्रीत बुमराहने कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिली अशी भावूक प्रतिक्रिया

---Advertisement---

2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात (India vs South Africa) 3 सामन्यांची कसोटी मालिका(Test Series) सुरु होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

त्याला कमरेच्या जवळ स्ट्रेस फ्रॅक्चर (stress fracture) झाल्याने या कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. त्याने कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ट्विटरवरुन भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

आत्तापर्यंत 12 कसोटी सामने खेळलेल्या बुमराहने ट्विट केले आहे की ‘दुखापती खेळाबरोबर येतात आणि त्या खेळाचाच भाग आहेत. तूम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मी हताश झालेलो नाही. माझे या दुखापतीतून मजबूत पुनरागमन करण्याचे ध्येय आहे.’

बुमराहच्या दुखापतीवर बीसीसीआयची वैद्यकीय टीम लक्ष ठेवणार असून तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग करेल.

तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराह ऐवजी आता भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवचा(Umesh Yadav) समावेश करण्यात आला आहे. यादव याआधी शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2018 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत 41 कसोटी सामन्यात 119 विकेट्स घेतल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

सांगलीकर स्म्रीती मंधनाने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी पहिलीच भारतीय

हरभजन, बुमराहलाही जे जमले नाही ते २२ वर्षीय दिप्ती शर्माने करुन दाखवले

भारताकडून वयाच्या १५ व्या वर्षी पदर्पण करणारी कोण आहे शेफाली वर्मा?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment