अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी टी20 विश्वचषकाआधी भारतीय संघाला जबर धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखण्यामुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली.
https://twitter.com/bcci/status/1576947712821690369?s=46&t=shPcrlKwbkWR81QVCBIO7w
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बुमराह यापूर्वीच बाहेर पडला होता. तेव्हापासून त्याच्या विश्वचषकात सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता बोर्डाने अधिकृत माहिती देत यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याच्या जागी अद्याप कोणत्याही दुसऱ्या खेळाडूची घोषणा केली गेली नाही.
बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने बुमराहची संपूर्ण तपासणी आणि त्याच्या रिपोर्ट्सवर नजर टाकल्यावर हा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी कोण खेळणार याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल.
बुमराहला पाठीच्या समस्येमुळे आशिया चषक 2022 या स्पर्धेसही मुकावे लागले होते. नंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे दोन टी20 सामने खेळले. यामध्येही त्याने काही विशेष कामगिरी केली नाही. त्याने मोहाली येथे झालेला पहिला सामना खेळला नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टी20 सामन्यात तो खेळला. यामध्ये त्याला केवळ एकच विकेट घेता आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी त्याच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली. प्रथम त्याला पहिल्या सामन्यातून बाहेर व्हावे लागले. मात्र, त्यानंतर तो संपूर्ण मालिकातून बाहेर जात असल्याची घोषणा आलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘ते 17 वर्षांनंतर आले तर त्यांना रिकाम्या…’ पाकिस्तान हरल्यावर हे काय बोलून गेले पीसीबी अध्यक्ष
T20WC: बुमराहबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मोठे भाष्य! म्हणाला, ‘भारताला जिंकण्यासाठी त्याचे संघात…’






