इंग्लंड आणि भारत यांच्यात रविवारी (19 जुलै) वनडे मालिका निर्णायक सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्याला भारताचा महत्त्वाचा खेळाडू मुकला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यातून संघाबाहेर झाला आहे. नाणेफेक झाल्यानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिलने हे वृत्त सांगितले.
इंग्लंडचा कर्णधार हॅरि ब्रूकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावर गिल म्हणाला, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची असून संघात तीन बदल झाले आहे. बुमराह खेळत नाहीये, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो उपलब्ध नाही. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि शिमव दुबे यांनाही वगळण्यात आले आहे. संघात केएल राहुल, प्रिन्स यादव आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे.”
“आम्ही आकडेवारीवर अवलंबून नाही. अर्शदीप एक चांगला गोलंदाज आहे. तसेच मधल्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळत नाही. त्यामुळे आम्हाला या सामन्यात चार सीमर्सची (वेगवान गोलंदाज) आवश्यकता आहे,” असेही गिलने पुढे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुमराहबद्दल अधिकृत माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये म्हटले की, ‘कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. डाव्या गुडघ्यावर उमटलेल्या सूजेमुळे (reactive swelling) त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात निवडले जाऊ शकले नाही.’
तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती, मात्र इंग्लंडने दुसरा सामना जिंकत ती बरोबरीत आणली. त्यामुळे तिसरा सामना हा दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. अशा या अतिमहत्त्वाच्या सामन्यात प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक खेळणार नाही, याचा भारतावर किती परिणाम होईल हे कळेलच.
लॉर्ड्सच्या वनडे सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा.
(Jasprit Bumrah ruled out of the 3rd ODI against England know the reason)






