भारतीय क्रिकेट संघ 2025 (Indian cricket team) सालापासून वनडे फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (Champions trophy) टीम इंडियाने 5 मालिका खेळल्या आहेत, ज्यापैकी 3 मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला असून केवळ 2 मालिका दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या घरगुती मालिका जिंकता आल्या आहेत.
वनडे फॉरमॅटमध्ये पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी टीम इंडियाला (Team india) या 4 स्टार खेळाडूंना संघात परत आणावं लागणार आहे. जेणेकरून संघ चांगली कामगिरी करू शकेल.
ऋषभ पंत
वनडे फॉरमॅटमध्ये ऋषभ पंतला (Rishbh Pant) अधिक संधी देणे गरजेचे आहे. बॅकअप विकेटकीपर म्हणून इशान किशनची (Ishaan kishan) परदेशातील कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही, तर याउलट ऋषभ पंतचा परदेशातील रेकॉर्ड खूपच चांगला आहे. पंत वनडेमध्ये टीम इंडियाच्या ‘फिनिशर’ची भूमिका उत्तम प्रकारे बजावू शकतो, म्हणूनच चाहते त्याच्या पुनरागमनाची मागणी करत आहेत.
मोहम्मद सिराज
सध्या टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी काहीशी कमकुवत दिसून येत आहे. अशा वेळी संघ व्यवस्थापनाला पुन्हा एकदा मोहम्मद सिराजकडे (Mohmmed Siraj) वळावे लागेल. परदेशातील खेळपट्ट्यांवर सिराज एक घातक गोलंदाज ठरू शकतो, त्यामुळे त्याला वनडे संघात पुन्हा संधी मिळायला हवी.
हार्दिक पांड्या
अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) अनुपस्थितीत टीम इंडियाचे संतुलन बिघडलेलं जाणवत आहे. जर हार्दिक पूर्णपणे फिट असेल आणि वनडे खेळला, तर संघाची कामगिरी अधिक चांगली दिसते. त्यामुळे वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या मजबुतीसाठी हार्दिकचे पुनरागमन अत्यंत महत्त्वाचे आहे.
हर्षित राणा
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने (Harshit Rana) अलीकडच्या काळात उत्तम कामगिरी केली आहे. गूरनूर बरार (Gurnoor Brar & Prince Yadav) आणि प्रिंस यादव यांच्या तुलनेत राणा अधिक प्रभावी ठरला आहे. याशिवाय, तो फलंदाजीही करू शकतो, ज्यामुळे तो 8 व्या क्रमांकावर संघाला स्थिरता देऊ शकेल. त्याच्या समावेशामुळे टीम इंडियाची वनडे टीम अधिक सक्षम होईल. आगामी काळात संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






