भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने शनिवारी (15 ऑक्टोबर) जसप्रीत बुमराहच्या फिटनेसविषयी खास प्रतिक्रिया दिली. दुखापतीमुळे बुमराह आशिया चषकात खेळला नव्हता आणि आगामी टी-20 विश्वचषकात देखील खेळू शकणार नाहीये. वारंवार दुखापत होत असल्यामुळे अनेकजण बुमराह आणि संघ व्यवस्थापनावर निशाणा साधत आहेत. आता कर्णधार रोहितने या सर्वांना सडेतोड उत्तर दिले आहे. रोहितच्या मते आगामी टी-20 विश्वचषकापेक्षा बुमराहची फिटनेस संघासाठी महत्वाची आहे.
आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पुनरागमन केले होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी तो पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला. दुखापतीमुळे बुमराह आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नाही आणि आगामी टी-20 विश्वचषकातून देखील त्याने माघार घेतली. आधी आशिया चषक आणि आता टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यामुळे चाहते अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दिलेल्या उत्तरामुळे अनेकांची बोलती बंद झाल्याचे दिसते. माध्यमांशी बोलताना रोहितने माहिती दिली की, मेडिकल टीमने बुमराहच्या फिटनेसविषयी कुठलीच जोखील घेण्यास नकार दिल्याचे सांगितले.
माध्यांमांशी बोलताना रोहितने बुमराहा टी-20 विश्वचषकात का खेळत नाहीये, याचे कारण सांगितले. रोहित म्हणाला, “बुमराह एक गुणवंत खेळाडू आहे. एका वर्षापासून तो खूप चांगले प्रदर्शन करत आहे. दुर्दैवाने त्याला दुखापत झाली आहे. पण तुम्ही यावर काहीच करू शकत नाही. आम्ही त्याच्या दुखापतीविषयी अनेकांशी चर्चा केली, पण आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. विश्वचषक खूप महत्वाचा आहे, पण त्याची कारकिर्दी आमच्यासाठी अधिक महत्वाची आहे. तो फक्त 28 वर्षांचा आहे आणि अजून त्याला खूप क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे ही मोठी जोखीम आम्ही पत्करणार नाही.”
“आम्ही ज्या एक्सपर्ट्ससोबत बोललो, त्यांनीही हाच सल्ला दिला. त्याला अजून खूप खेळायचे आहे. तो भविष्यात भारतासाठी खूप सारे सामने केळणार आहे आणि खूप सामन्यांमध्ये विजय देखील मिळवून देणार आहे, यात काहीच शंका नाही,” असेही रोहित पुढे बोलताना म्हणाला. दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या बदली खेळाडूच्या रूपात संघ व्यवस्थापनाने मोहम्मद शमीला संघात सामील केले आहे. शमी आधीच राखीव खेळाडूंमध्ये सहभागी होता, आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले जाऊ शकते. भारताला विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जरा इकडं पाहा! पाकिस्तानी पठ्ठ्यासोबत परदेशी चाहतीला करायचंय लग्न, क्रिकेटपटूवर लागलेत गंभीर आरोप
हे काय होतं! जेमिमाचे सेलिब्रेशन पाहून तुम्हीही असंच म्हणाल; भन्नाट व्हिडिओ व्हायरल