वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (11 ऑक्टोबर) भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी व अझमतुल्लाह ओमरझाई यांनी शानदार अर्धशतके ठोकली. त्यांच्या खेळाच्या जोरावर अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले. मात्र भारतीय संघासाठी प्रमुख वेगवान जसप्रीत बुमराह याने चार बळी मिळवले. यासह वनडे विश्वचषकातील आपली उत्कृष्ट कामगिरी त्याने कायम ठेवली.
या सामन्यात भारतीय संघाला पहिला बळी बुमराह याने मिळवला. त्यांनी फॉर्ममधील इब्राहिम झादरान याला बाद केले. त्यानंतर आपल्या तिसऱ्या स्पेलमध्ये त्याने अर्धशतक करून खेळत असलेला अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी, अनुभवी मोहम्मद नबी व नजीब झादरान यांना देखील तंबूचा रस्ता दाखवला. त्याने आपल्या दहा षटकात फक्त 39 धावा देऊन चार गडी बाद केले.
वनडे विश्वचषकात आतापर्यंत त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. 2019 मध्ये त्याने आपला पहिला विश्वचषक खेळताना दहा सामन्यात 18 बळी मिळवले होते. त्यानंतर या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील त्याने आपली ही कामगिरी अशीच सुरु ठेवली. त्याने या सामन्यात दोन बळी मिळवले होते.
(Jasprit Bumrah Sensational Record In ODI World Cup Continue)
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने हालवलं ख्रिस गेलचं ‘सिंहासन’, खास यादीत अखेर पहिला क्रमांक मिळवलाच
“माझी बॅटच उत्तर देईल”, विश्वविक्रमी शतकानंतर रोहितचे 12 वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल