भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. भारतीय संघासाठी तो आशिया चषकात खेळत नसला, तरी खेळापासून लांग मात्र नाहीये. त्याने बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवला. युवा खेळाडूंसोबत त्याने भारतीय संघासोबत खेळताना मिळालेला अनुभव शेअर केल्याचे समोर समजते. बुमराहाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.
जयप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक खास पोस्ट शेअर केली गेली आहे. त्याने शेअर केलेल्या दोन फोटोंमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमधील युवा खेळाडू दिसत आहेत. सर्वजण समोरच्या बाजुला बसले असताना बुमराह त्यांना काही सल्ले देताना दिसतो, जे भविष्यात नक्कीच त्यांच्या कामी येऊ शकतात. बुमराहने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “खूप जास्त दिवस झाले नाहीत, जेव्हा मी दुसऱ्या बाजूला होतो आणि जितके शक्य असेल, तितके शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. त्यामुळे आज या युवा खेळाडूंना भेटून आपले ज्ञान त्यांना देण्याची संधी, माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे.”
Not long ago, I was on the other side, learning, observing and grasping everything I could. Which is why it means a lot to me to be able to use the knowledge I have today to help youngsters along the way. pic.twitter.com/T5cx13WWKo
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) September 4, 2022
दरम्यान, बुमराहाने त्याचा शेवटचा सामना भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यावर खेळला होता. त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याचा कामाचा तान कमी करण्यासाठी त्याला वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माहिती समोर आली होती की, बुमराहला दुखापत झाली आहे आणि आशिया चषक स्पर्धेत तो खेळताना दिसणार नाही. मात्र, चाहत्यांना अजूनही या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळाले नाहीये की, बुमराह विश्रांतीवर असताना देखील त्याला दुखापत झालीच कशी? बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराह आशिया चषकानंतर भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे.
आशिया चषकानंतर भारतीय संघाला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील मालिका खेळायच्या आहेत. बुमराह या मालिकांदरम्यान संघात पुनरागमन करेल, अशी पूर्ण शक्यता आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज आहे, ज्यामुळे त्याची फिटनेस संघासाठी चिंतेची बाब बनली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लिजेंड्स लीग गाजवायला येतोय ‘युनिव्हर्स बॉस’; सुल्तान सेहवागसह करणार ओपनिंग
INDvsPAK: अखेर पाकिस्तानी संघाला दिलाया! रोहितच्या रुपात भारताला पहिला झटका
आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धा: इंडोनेशियाचा मुहंमद हलिम सिदिक विजेता, पुण्याच्या दर्शन पुजारी उपविजेता