न्यूझीलंडकडून कसोटी मालिका 3-0 ने गमावल्यानंतर आता रोहित शर्मा आणि कंपनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या सहभागाबाबत साशंकता आहे. भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांचे मत आहे की, जर रोहित शर्माने एकापेक्षा जास्त कसोटी सामने गमावले तर जसप्रीत बुमराहला कर्णधार म्हणून नियुक्त केले पाहिजे. तो म्हणाला की, मालिकेतील पहिला सामना कर्णधारासाठी खेळणे खूप महत्त्वाचे आहे.
रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह प्रेग्नंट आहे आणि लवकरच दोघेही दुसऱ्यांदा आई-वडील होऊ शकतात. पत्नीच्या प्रसूतीमुळे रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्याच्या निवडीसाठी उपलब्ध होऊ शकत नाही. मात्र, दुसऱ्या कसोटीत तो संघात सामील होण्याची आशा आहे. पर्थ कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसु शकतो.
पुढे बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “कर्णधारासाठी पहिला कसोटी सामना खेळणे खूप महत्त्वाचे असते. त्याला दुखापत झाली तर वेगळी बाब आहे, पण तो उपलब्ध नसेल तर उपकर्णधारावर खूप दडपण असेल. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही आसा अंदाज आहे, त्यामुळे मला वाटते की अशा परिस्थितीत निवड समितीने जसप्रीत बुमराहला संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाचा कर्णधार बनवावे आणि रोहित शर्माला सांगावे की तू या मालिकेत खेळाडू म्हणून सहभागी होशील. कारण पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माचे तिथे असणे आवश्यक आहे.”
न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत रोहित शर्माची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. भारतीय कर्णधाराला तिन्ही कसोटीत 100 धावाही करता आल्या नाहीत. तो मालिकेतील सर्वात वाईट कामगिरी करणारा होता. कर्णधारपद आणि फलंदाजीमुळे रोहित चाहत्यांच्या संतापाचे कारण ठरला. आता त्याला बॉर्डर-गावस्कर ट्राॅफीत स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे.
हेही वाचा-
“फिरकी गोलंदाजी खेळण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे….” इंग्लंडच्या माजी कर्णधारानं टीम इंडियाला डिवचलं
Happy Birthday Virat Kohli: ‘चेस मास्टर’ विराट कोहलीचे हे 5 विक्रम मोडणे अशक्य! जवळपासही कोणी नाही
रोहित शर्मानंतर कसोटीत कर्णधार कोण? दिग्गज क्रिकेटपटूचा धक्कादायक अंदाज!