---Advertisement---

“इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहला सगळे सामने खेळवण्याची गरज नाही”

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. मात्र या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्यामुळे तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्याचबरोबर या मालिकेत भारतीय संघातील बर्‍याच खेळाडूंना दुखापत झाली आहे. तसेच तिसर्‍या सामन्यात भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे की, भारतीय संघ व्यवस्थापकांनी त्याची काळजी घ्यायला हवी.

भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज गौतम गंभीर याचे म्हणणे आहे की, संघ व्यवस्थापकांनी जसप्रीत बुमराहची पूर्ण काळजी घ्यावी. गरज पडल्यास भारतात होणार्‍या इंग्लंड मालिकेत त्याला आराम दिला जावा. कारण कारण जसप्रीत बुमराह आयपीएल स्पर्धेपासून लगातार पाच महिने क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुखापत झाली आहे. त्याच्या पोटातील मांसपेशीमध्ये ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे गौतम गंभीरचे म्हणणे आहे की, भारतात इंग्लंड विरुद्ध होणार्‍या मालिकेत जसप्रीत बुमराहला सर्व सामने खेळवण्यास प्रवृत्त करू नये. कारण असे जर झाले तर त्याच्यावर अन्याय होईल.

गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्स सोबत चर्चा करताना म्हणाला, “बुमराहची चांगली देखभाल केली जावी. कारण तो खूप काळ भारतीय संघाच्या गोलंदाजीची कमान सांभाळणार आहे. त्याने फिट राहणे खूप गरजेचे आहे. भारतीय संघ जेव्हा इंग्लंड विरुद्ध चार सामन्याची खेळेल, तेव्हा त्याला चारही सामने खेळायला लावणे म्हणजे त्याच्यावर अन्याय असेल. मला माहित आहे की, इशांत शर्मा फिट नाही. उमेश यादव आणि मोहम्मद शमी फिट नाहीत.”

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “भारतात बुमराह घातक गोलंदाज ठरू शकेल. भारतात बुमराहने अजून पर्यंत एकही कसोटी सामना खेळला नाही. मला विश्वास आहे की भारतीय संघ व्यवस्थापकांनी त्याची काळजी घेतली असेल. तो दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळला आहे. त्यामुळे तो भारतात अजून ही धोकादायक ठरू शकतो, कारण खेळपट्टी संथ आहे आणि तो रिव्हर्स स्विंग चांगल्या प्रकारे करू शकेल. ”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ब्रिस्बेन येथे या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारीला खेळला जाणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतीय संघाने अजून पर्यंत आपली प्लेईंग इलेव्हन चौथ्या सामन्यासाठी जाहीर केली नाही.

महत्वाच्या बातम्या:

दोन दशकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा गाजतोय अझरुद्दीन; काय आहे नावामागील मनोरंजक रहस्य, वाचा

न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा, दुखापतीमुळे उपकर्णधार मालिकेला मुकणार

नॅथन लॉयनपेक्षा अश्विनकडे ८०० बळी घेण्याची क्षमता अधिक माजी महान फिरकीपटूने मांडले मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---