भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी (१५ जानेवारी) तडकाफडकी आपल्या नेतृत्वाचा राजीनामा (Virat Kohli Resign As Test Captain) दिला. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून शनिवारी कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला. त्या घटनेस २४ तास होण्याच्या आधीच विराटने हा निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयानंतर भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्याच वेळी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज व वनडे संघाचा नवनियुक्त उपकर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने एक असे व्यक्तव्य केले आहे, ज्यामुळे कर्णधार पदाच्या चर्चेला नवे वळण लागू शकते. (Jasprit Bumrah On Captancy)
काय म्हणाला बुमराह?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बुमराह म्हणाला,
“माझ्यावर जी काही जबाबदारी पडेल ती स्वीकारण्यास मी तयार आहे. मला नेतृत्वाची संधी मिळाली तर तो माझा सन्मान ठरेल. कोणता खेळाडू ते नाकारेल? मला कोणत्याही परिस्थितीत संघासाठी योगदान द्यायचे आहे. मग, भूमिका कोणतीही असो.”
तू वनडे उपकर्णधारपदाच्या भूमिकेकडे स्वत:च्या नजरेतून कसे पाहतोय या प्रश्नाचे उत्तरही भारतीय वेगवान गोलंदाजाने दिले. तो म्हणाला,
“मी उपकर्णधार झालो आहे पण माझी भूमिका बदललेली नाही. मी कर्णधार केएल राहुलला मदत करेन. गोलंदाजीत बदल करता येतील का, सामन्यात काय करता येईल? याचे सल्ले मी त्याला देईल. उपकर्णधारपद मिळाल्याने माझ्यावर कोणतेही दडपण नाही.”
बुमराहने या पत्रकार परिषदेत नुकताच कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिलेल्या विराट कोहलीचे भविष्यासाठी अभिनंदन केले.
कर्णधार म्हणून लागू शकते रोहितची वर्णी
विराट कोहलीने अचानकपणे कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने आता ती जागा रिक्त झाली आहे. या जागेवर रोहित शर्मा याची वर्णी लागू शकते. यासोबतच केएल राहुल याच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचे दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांनी यष्टीरक्षक रिषभ पंत याचे नाव कर्णधारपदासाठी सुचवले आहे. (Rohit Sharma & KL Rahul Front Runner For Test Captaincy)
महत्त्वाच्या बातम्या-
‘पार्ट-टाइम कॅप्टन’ अशी बनेल रोहितची ओळख! इतिहास पाहून तुम्हीही असेच म्हणाल (mahasports.in)
हरभजन सिंगने निवडली त्याची ‘ऑल टाइम इलेव्हन’; विराटला जागा दिली, पण नेतृत्त्वपद नाही (mahasports.in)