---Advertisement---

विश्वचषक २०१९: भारताच्या या खेळाडूची झाली डोपिंग टेस्ट

On: मंगळवार, जून 4, 2019 11:58 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना बुधावारी(5 जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला डोपिंग टेस्टला सामोरे जावे लागले आहे.

सोमवारी(3 जून) साउथँम्पटनमध्ये रोज बॉल स्टेडियमवर भारतीय संघ सराव करत असताना डोपिंग नियंत्रण अधिकारी बुमराहला डोप टेस्ट करण्यासाठी घेऊन गेले.

या डोप टेस्टमध्ये पहिल्या फेरीत बुमराहची युरिन टेस्ट घेण्यात आली आणि 45 मिनिटानंतर रक्ताचे नमुने घेण्यात आले.

बुमराहला जरी डोप टेस्ट करावी लागल्याचे काही चाहत्यांना आश्चर्य वाटले असले तरी नियमानुसार आयसीसीच्या स्पर्धेदरम्यान बीसीसीआयच्या प्रत्येक खेळाडूला वर्ल्ड ऍन्टी डोपिंग एजन्सीद्वारा(वाडा) घेतल्या जाणाऱ्या डोपिंग टेस्टला सामोरे जावे लागते.

बीसीसीआयच्या सुत्राने बुमराहची खरचं डोपिंग टेस्ट झाल्याबद्दल स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी अजून पुढे कोणत्या खेळाडूची डोपिंग टेस्ट होणार आहे याबद्दल माहिती दिलेली नाही.

2019 च्या या विश्वचषकात बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज आहे. त्याच्या कामगिरीवर भारतीय संघ बराच अवलंबून आहे. तसेच बुमराहचा हा पहिलाच वनडे विश्वचषक आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

टीम इंडियाचे २०१९-२० मधील घरच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईमध्ये होणार हे सामने

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या या खेळाडूने घेतले तब्बल ४ झेल, विश्वविक्रमाचीही केली बरोबरी

विराट कोहलीच्या टीम इंडियाला भारतीय फुटबॉल संघाकडून खास शुभेच्छा, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment