विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. चौथ्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे एकही चेंडूचा खेळ झाला नव्हता. त्यानंतर पाचव्या दिवशी (२२ जून) दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पाचव्या दिवशी देखील सामना एक तास उशीरा सुरू झाला. या सामन्यादरम्यान दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडून मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांना एक विशेष जर्सी देण्यात आली आहे. ज्यामध्ये भारतीय संघाच्या जर्सीवर एमपीएलचा लोगो एका बाजूला आहे. तर समोर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना २०२१ असे लिहिले आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह चुकीची जर्सी घालून मैदानावर आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पहिले षटक टाकून झाल्यावर त्याला पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये जाऊन जर्सी बदलून यावे लागले.
त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजाच्या या कृतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
https://twitter.com/muduli_seema/status/1407310067804741639?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1407310067804741639%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fcricket%2Fcricket-news%2Fwtc-final-2021-jasprit-bumarh-wore-worng-jersey-5th-day-paly-icc-world-test-championship-final-he-had-to-return-from-the-field-after-one-over-bowling
Bumrah running back to dressing room to change the jersey after the first over. #INDvNZ pic.twitter.com/IsJo04UO83
— Johns. (@CricCrazyJohns) June 22, 2021
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाला सर्वबाद २१७ धावा करण्यात यश आले होते. भारतीय संघाकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले. तसेच पाचव्या दिवशी मजबूत दिसत असलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी लवकर माघारी धाडले होते. न्यूझीलंड संघाला दुसऱ्या डावात सर्वबाद २४९ धावा करता आल्या. (Jasprit bumrah wore wrong jersey on 5th day of wtc final)
तसेच जसप्रीत बुमराह विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत २६ षटक गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने ९ निर्धाव षटके टाकली आहेत. परंतु त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नाही. जसप्रीत बुमराहच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत २० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २.७० च्या इकोनॉमीने ८३ गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सुपरमॅन नाही शुब-मॅन’! गिलने चित्याच्या चपळाईने पकडला टेलरचा नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ: शमीच्या लाजवाब चेंडूवर किवी फलंदाज निरुत्तर, क्लीन बोल्ड होऊन परतला तंबूत
कडकच ना! युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्री वर्मासह सोनाक्षी सिन्हाच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स