---Advertisement---

शुबमन-रोहितची विकेट टीम साउथीसाठी ठरली ‘विक्रमी’, घातली मोठ्या किर्तीमानाला गवसणी

On: बुधवार, जून 23, 2021 9:05 AM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघातील गोलंदाजांनी उल्लेखनीय गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाला २४९ धावांवर सर्वबाद केले. तर भारताच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या संघातील वेगवान गोलंदाज टीम साउथी याने सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्के दिले. यासोबतच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला अजे.

टीम साउथीने केला किर्तीमान
भारतीय संघ त्यांच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना, न्यूझीलंड संघाकडून अकरावे षटक टाकण्यासाठी टीम साउथी आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने सलामीवीर शुबमन गिलला पायचीत करत माघारी धाडले. याबरोबरच २६.५ षटकात धाकड सलामीवीर रोहितलाही पायचित केले. अशाप्रकारे गिल आणि रोहितला बाद करताच त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स पूर्ण झाले आहेत. असा कारनामा करणारा तो न्यूझीलंड संघाचा केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे.

यापूर्वी न्यूझीलंड संघाचे माजी फिरकीपटू डॅनियल विटोरी यांनी हा कारनामा केला होता. विटोरींच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९१ विकेट्स आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर रिचर्ड हेडली आहेत, ज्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ५८९ विकेट्स घेतल्या होत्या. तर चौथ्या स्थानी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे. बोल्टने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०४ गडी बाद केले आहेत.

भारतीय संघाचे जोरदार पुनरागमन
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय संघातील गोलंदाजांनी भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ४ विकेट्स घेतल्या. तर ईशांत शर्माने २ फलंदाजांना माघारी धाडले होते. यासोबतच अश्विनने २ विकेट्स घेतल्या तर रवींद्र जडेजाला १ विकेट घेण्यात यश आले.

अशाप्रकारे भारतीय गोलंदाजांनी मिळून न्यूझीलंडला २४९ धावांवर रोखले आणि न्यूझीलंडने पहिल्या डावात केवळ ३२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर पाचव्या दिवसअखेर, भारतीय संघ २ बाद ६४ धावा अशा स्थितीत आहे. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानावर आहेत.

न्यूझीलंड संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
डॅनियल विटोरी : ६९६ विकेट्स
टीम साउथी : ६०१ विकेट्स
रिचर्ड हेडली : ५८९ विकेट्स
ट्रेंट बोल्ट : ५०४ विकेट्स

महत्वाच्या बातम्या –

नादच खुळा! विराटने आयसीसीच्या स्पर्धांच्या फायनलमध्ये केलेत सचिन-पॉटींगपेक्षाही मोठे विक्रम

मुथय्या मुरलीधरनला मिळाला २१ व्या शतकातील महान गोलंदाजाचा मान; ‘या’ दिग्गजांना टाकले मागे

‘इंग्लंडमध्ये जन्मलो असतो, तर आज जिवंत नसतो’; वेस्ट इंडिजच्या माजी दिग्गजाचे हैराण करणारे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---