सध्या आयपीएल 2021 हंगामाला स्थगिती दिली गेली असून सर्वच खेळाडू आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. आयपीएल 2021 ला सुरुवात होण्याअगोदर जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा विवाह झाला होता. आयपीएल सामने जरी स्थगित झाले असले, तरीही भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे बुमराह इंग्लंडला जाण्याअगोदर कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. त्याच दरम्यान पत्नी संजनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत ती मस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून चाहत्यांनी संजनाला बुमराह कुठे आहे? अशी विचारणा केली आहे.
संजनाने इंस्टाग्राम रीलवर आपल्या डान्सचे कौशल्य दाखवले आहे. तिच्या या व्हिडिओला 92 हजार पेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिले आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.
संजनाच्या या व्हिडिओला जसप्रीत बुमराह आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्याव्यतिरिक्त भारतीय माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी यांची पत्नी आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स निवेदिका मयंती लैंगर हिने देखील पसंती दिलेली आहे. इंस्टाग्रामवर संजनाचे 5 लाख 63 हजार फॉलोअर्स आहेत. आंद्रे रसल, केएल राहुल, ब्रेट ली यांच्यासह अनेक दिग्गज तिला फॉलो करतात.
https://www.instagram.com/p/CPIZJc1p7p7/?utm_source=ig_web_button_share_sheet
संजनाने स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी ‘बॅडमिंटन प्रीमियर लीग’ आणि ‘दिल से इंडिया’ यांसारखे कार्यक्रमाचे निवेदन केले आहे. ती शाहरुख खानचा आयपीएल संघ कोलकत्ता नाईट रायडर्सची समर्थक आहे आणि संघाचे कार्यक्रम ‘The Knight club’ची निवेदिका आहे. संजनाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. तिने मॉडलिंगमध्ये खूप पुरस्कार जिंकले. जसे की ‘Femina Officially Gorgeous’. संजनाने ‘फेमिना मिस इंडिया पुणे’मध्येही सहभाग घेतला होता व ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.
2014 मध्ये संजना MTV Splitsvillaच्या सातव्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. ज्यामध्ये सनी लियोनी आणि निखिल चिनापा यांनी निवेदन केले होते. परंतु दुखापतीच्या कारणामुळे संजनाला हा कार्यक्रम सोडावा लागला होता. जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2016 मधील वनडे आणि टी२० सामन्यापासून आंतरराष्ट्रीय कारिकर्दीची सुरुवात केली होता. 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो सध्याच्या भारतीय संघाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
BANvSL: श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव, आजचा वनडे सामना होणार की नाही? पाहा
विराटच्या शतकाची प्रतिक्षा कधी संपणार? पाकिस्तानी दिग्गज म्हणतो, “कोहलीसारखा फलंदाज…”