श्रीलंका क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघात आजपासून (२३ मे) शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. तर पुढील सामने २५ मे आणि २८ रोजी खेळवले जाणार आहेत. परंतु या मालिकेचा श्रीगणेशा होण्यापुर्वीच कोरोना व्हायरसने ताफ्यात प्रवेश केला आहे.
श्रीलंका क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि २ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. असे असले तरीही, आज होणारा पहिला वनडे सामना ठराविक वेळेनुसार सुरू करण्यात येणार असल्याचे समजत आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या वृत्तानुसार, ‘श्रीलंका संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक चमिंडा वास आणि क्रिकेटपटू इसुरु उडाना व शिरन फर्नांडो यांना शनिवारी (२२ मे) कोरोनाचे संक्रमण झाले असल्याचे आढळले होते. परंतु त्यांची दुसरी चाचणी केली असता यातील दोघांचा कोरोना अहवाल आज (२३ मे) निगेटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आज होणारा पहिला वनडे सामना ठराविक वेळेनुसार खेळवला जाणार आहे.’
महत्त्वाचे म्हणजे, शनिवारी (२२ मे) बांगलादेश संघाचे माजी कर्णधार आणि क्रिकेट बोर्डाचे संचालक खालिद महमूद कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. याच कारणामुळेच ते बांगलादेश-श्रीलंका वनडे मालिकेचा भाग नाहीत. खालिद हे ३१ मे पासून सुरू होणाऱ्या ढाका प्रीमियर लीगमधील फ्रँचायझीचे प्रशिक्षक आहेत. सध्या ते आपल्या घरीच विलग्नवासात आहेत.
https://twitter.com/ESPNcricinfo/status/1396336708564623362?s=20
बांगलादेश संघ- तमीम इक्बाल (कर्णधार), मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), लिटोन दास, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, सौम्य सरकार, मोहम्मद मिथुन, मेंहिदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, मोसद्देक होसैन, आफिफुल इस्लाम, शोरिफुल इस्लाम
श्रीलंका संघ- कुसल परेरा (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दनुष्का गुणथिलाका, कुसल मेंडिस, निरोशन डिकवेला, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, इसुरु उडाना, लखन संडाकन, दुशमंत चमेरा, चमिका करुणारत्ने, बिनूरा फर्नांडो, रमेश मिनिस्का, अशेन बंडारा, शिरन फर्नांडो
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या शतकाची प्रतिक्षा कधी संपणार? पाकिस्तानी दिग्गज म्हणतो, “कोहलीसारखा फलंदाज…”






