इंग्लंडविरुद्धचा ऍजबस्टन येथे झालेला पाचवा कसोटी सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने गमावला. यासह ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ ने बरोबरी सुटली आहे. या संपूर्ण मालिकेदरम्यान त्यातही पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याने प्रभावी प्रदर्शन केले. हातखंडा असलेल्या गोलंदाजीसह फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चमकदार प्रदर्शन करत तो भारताचा मालिकावीर बनला आहे.
जसप्रीत बुमराहचे अष्टपैलू प्रदर्शन
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्यासाठी इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) संघातील ही ५ सामन्यांची कसोटी मालिका (5 Matches Test Series) स्वप्नवत राहिली. सुरुवातीचे ४ सामने खेळाडू म्हणून गाजवल्यानंतर पाचव्या सामन्यात त्याच्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या खांद्यावरील जबाबदारींचे ओझे वाढल्यानंतर बुमराहमधील अष्टपैलू जागा झाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्याने पाचव्या कसोटी सामन्यात प्रभावी प्रदर्शन केले.
या संपूर्ण सामन्यात त्याने गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना पहिल्या डावात १६ चेंडूत नाबाद ३१ धावांची झंझावाती खेळी खेळली. २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ही वादळी खेळी केली होती. तसेच त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात कर्णधार बेन स्टोक्सचा नेत्रदिपक झेलही पकडला होता.
त्याच्या संपूर्ण कसोटी मालिकेतील प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने ५ सामन्यांमध्ये २२.४७ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या. यादरम्यान ६४ धावांवर ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली. तसेच त्याने २०.८३ च्या सरासरीने फलंदाजी करताना १२५ धावाही काढल्या.
2⃣3⃣ wickets
Best bowling Figures (In Innings): 5⃣/6⃣4⃣
An average of 2⃣2⃣.4⃣7⃣#TeamIndia's Player of the Series is @Jaspritbumrah93 👏 👏 #ENGvIND pic.twitter.com/APkOhYC1tJ
— BCCI (@BCCI) July 5, 2022
बुमराहने जिंकली मने
या प्रदर्शनानंतर बुमराहला भारताचा मालिकावीर (Man Of The Series Of India) म्हणून निवडण्यात आले आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, नियमित कर्णधार रोहित शर्मा यांना मागे सोडत बुमराहने भारताकडून मालिकावीर पुरस्कार जिंकण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
तर इंग्लंडकडून शतकांनंतर शतके ठोकणाऱ्या जो रूटने (Joe Root) मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे. रुटने भारताविरुद्ध ५ सामने खेळताना ४ शतकांच्या मदतीने ७३७ धावा केल्या आहेत. याच प्रदर्शनाच्या जोरावर तो इंग्लंडकडून मालिकावीर पुरस्काराचा मानकरी बनला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाचव्या कसोटीनंतर पहिल्या टी२० सामन्यालाही मुकणार रोहित शर्मा? समोर आली मोठी अपडेट
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियानेही आखली भारताला पराभूत करण्याची व्यूहरचना
मजबूत स्थितीत असतानाही टीम इंडियाच्या हाती पराभव, चूक सांगत शास्त्रींची खेळाडूंना फटकार