आयसीसी वनडे विश्वचषक 2019 स्पर्धा यादगार राहिली होती. नवा विजेता, रोमांचक अंतिम सामना आणि सालाबादप्रमाणे अनेक यादगार खेळी आणि विक्रमांची सरबत्ती यांचा समावेश या विश्वचषकात होता. भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडावे लागले होते. भारताच्या खेळाडूंनीही स्पर्धेदरम्यान खास विक्रम आपल्या नावावर केले. त्यामध्ये जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही समावेश आहे.
विश्वचषक 2019 (World Cup 2019) स्पर्धेतील जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या गोलंदाजीची सर्वत्र वाहवा झाली. मात्र, अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष त्याच्या खास विक्रमांकडे गेलेच नाही. चला तर, कोणते आहेत ते विक्रम, जाणून घेऊयात…
सामन्यांपेक्षा दुप्पट विकेट्स
बुमराह याने 2019 विश्वचषकापूर्वी आणि नंतर आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानाचा खेळाडू राहिला होता. स्पर्धेत त्याने एकूण 9 सामने खेळले. तसेच, त्याने यादरम्यान एकूण 84 षटके टाकली. यावेळी त्याने 20.61च्या सरासरीने आणि 4.41च्या इकॉनॉमी रेटने एकूण 18 विकेट्स घेतल्या. यादरम्यान 55 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराह पाचव्या क्रमांकावर राहिला होता. मात्र, स्पर्धेत सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर झाला. त्याने स्पर्धेत एकूण 9 षटके निर्धाव टाकली होती. बुमराहनंतर सर्वाधिक 8 निर्धाव षटके टाकणारा खेळाडू जोफ्रा आर्चर होता.
सामने 9 पण धाव फक्त 1
बुमराह याच्या नावावर वनडे विश्वचषक 2019मधील एक विचित्र विक्रमदेखील आहे, जो इतर कुठल्याही खेळाडूला करता आला नाही. तो विक्रम म्हणजेच, सामन्यात सर्वाधिक सामने खेळताना नाबाद राहून फक्त 1 धाव करण्याचा. बुमराहला या स्पर्धेतील एकूण 9 सामन्यांपैकी 3 डावात फलंदाजीची संधी मिळाली. या तिन्ही वेळा तो नाबाद राहिला, पण त्याला फक्त एक धावच काढता आली.
बुमराहची वनडे कारकीर्द
बुमराहने भारताकडून 77 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 76 डावात गोलंदाजी करताना त्याने 24.24च्या सरासरीने आणि 4.61च्या इकॉनॉमी रेटने 126 विकेट्स घेतल्या आहेत. 19 धावा खर्चून 6 विकेट्स ही त्याची वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (Jasprit Bumrah World Cup 2019 Record take a look)
विश्वचषक विशेष-
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद
किस्से वर्ल्डकपचे: आणि मलिंगाचे ‘ते’ चार चेंडू इतिहासात अजरामर झाले
किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं
World Cup 2023 Preview: 10 संघांपासून ते सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत, सर्व माहिती एकाच क्लिकवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा