---Advertisement---

जसप्रीत बुमराहची शानदार कामगिरी! धोनी-कोहली यांच्या क्लबमध्ये एन्ट्री

On: शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025 7:00 PM
---Advertisement---

जसप्रीत बुमराह हा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. ज्याने भारतासाठी तीनही फॉरमॅट्स (टेस्ट, वनडे आणि टी20) मध्ये किमान 50-50 सामने खेळले आहेत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळत असलेला दुसरा टेस्ट सामना बुमराहचा 50वा कसोटी सामना आहे. बुमराह एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा जसप्रीत बुमराहच्या कसोटी करिअरचा 50वा सामना आहे. याआधी खेळलेल्या 49 कासोटी मध्ये त्याने 222 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 15 वेळा फाईव्ह-विकेट हॉल मिळवले आहेत.

31 वर्षीय बुमराहने 2016 मध्ये ओडीआयमध्ये पदार्पण केले, त्याच वेळी त्याने टी20मध्येही पदार्पण केले. त्यानंतर 2 वर्षांनी त्याने आपला पहिला कसोटी सामना खेळला. जसप्रीत बुमराहने आता 50 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 89 वनडे आणि 75 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

जसप्रीत बुमराह हा भारताचे पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहेत, ज्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये किमान 50 सामने खेळले आहेत. असे करणारा तो भारताचा 7वा खेळाडू आहे. त्यापूर्वी एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि केएल राहुल यांनी हे यश मिळविले आहेत. आता बुमराह देखील या यादीत सामील झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---