---Advertisement---

भारतीय गोलंदाज मागायचे आमची माफी, आम्ही करायचो चांगली धुलाई

---Advertisement---

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जावेद मियाँदादने दावा केला आहे की, त्यांनी १९७८-७९च्या मालिकेत भारतीय संघाच्या गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या होत्या. त्यामुळे ते आमची माफी मागत असायचे. मियाँदाद यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर ही माहिती दिली.

मियाँदाद म्हणाले की, “त्यावेळी संपूर्ण जगातील फलंदाज इरापल्ली प्रसन्ना (Erapalli Prasanna), बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi), वेंकटराघवन (S. Venkataraghavan) आणि भागवत चंद्रशेखर (Bhagwath Chandrasekhar) या खेळाडूंच्या गोलंदाजीला घाबरत होते. परंतु या भारतीय गोलंदाजांविरुद्ध पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली फटकेबाजी केली होती.”

मियाँदाद यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्या १९७८-७९मधील भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावरील एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, “भारताविरुद्धची ती मालिका होती. त्यावेळी बिशन बेदी कर्णधार होते. या मालिकेतील सामना फैसलाबादमध्ये सुरु होता. चंद्रशेखर, वेंकटराघवन, प्रसन्ना आणि स्वत: बेदी भारतीय संघाची ताकत होते. या चारही खेळाडूंनी जगातील इतर खेळाडूंना चिंतेत टाकले होते. परंतु पाकिस्तानच्या फलंदाजांनी त्यांच्याविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली होती. तो सामना आजही मला आठवतो.”

मियाँदाद पुढे म्हणाले की, “चंद्रशेखर जहीर भाईला त्रास देत होते. त्यांने मला सांगितले की, जावेद तू सांभाळून घे. मला त्याने चंद्रशेखरच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करायला सांगितली आणि स्वत: इतर तीन गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी करत होता. हे सर्व मी नॉन स्ट्रायकर एंडवर उभा राहून पाहत होतो. त्यानंतर मी झहीर भाईला म्हटले की, आता मी शेवटच्या चेंडूवर एक धाव घेणार नाही.  कारण मलाही धावा करायच्या आहेत.”

“चंद्रशेखर असा गोलंदाज होता की, त्याला फ्रंटफूटवर खेळणे कठीण होते. परंतु तो आमची माफी मागत होता. एका विकेटसाठी तो २०० पेक्षा अधिक धावा देत असायचा,” असेही मियाँदाद पुढे म्हणाले. मियाँदादने त्या सामन्यात १५४ आणि जहीर अब्बासने १७६ धावांची तूफान खेळी केली होती.

यावेळी मियाँदाद यांनी युवा खेळाडूंना सल्ला दिला की, पीचवर थांबण्याबरोबरच आक्रमकपणे धावा करणेही तितकेच गरजेचे आहे. ते म्हणाले की, “जेव्हा भारतीय गोलंदाज माझ्यापुढे क्षेत्ररक्षक उभे करत होते, तेव्हा मी पुढे येऊन जोरदार फटकेबाजी करत होतो. खेळपट्टीवर थांबणेच नाहीतर, धावा करणेही खूप आवश्यक असते. मी इंझमामला स्वत: प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर त्याने मुरलीधरनच्या गोलंदाजीवर खूप फटकेबाजी केली होती. तसेच आपली दमदार शतकी खेळी केली होती.

मियाँदादने यावेळी जहीर अब्बासची खूप प्रशंसा केली. ते म्हणाले की, “जहीर अब्बास उत्कृष्ट खेळाडू होता. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. तसेच गोलंदाज त्याच्याविरुद्ध खेळण्यास घाबरत होते. तो आशियाचा ब्रॅडमन होता. अब्बास माझ्या भावासारखा आहे. आम्ही सोबत खेळलो आहे. जहीरने काऊंटी क्रिकेटमध्ये १०० शतक केले आहेत.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-इंटरनॅशनल क्रिकेट न खेळताही खेळाडू कशी करतात कमाई?

-आशिया खंडाबाहेर धोनीला हा पराक्रम कधीही जमलाच नाही पण पंतने मात्र

-क्रिकेटसाठी त्याने अलिशान घर, महागडी गाडीसह सर्व विकले, आता आली अशी वेळ..

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---