भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. यावर्षी खेळला जाणारा आशिया चषक कुठे आयोजित होणार, यावरून या दोन कट्टर प्रतिस्पर्धी देशांमध्ये वाद सुरू आहे. उभय संघांतील हा वाद आता अधिकच वाढण्याची शक्यता आहे. कारण बीसीसीआय सचिव जय शहा भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, या भूमिकेवर ठाम आहेत.
बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबी (PCB) यांच्या उपस्थितीत शनिवारी (5 फेब्रुवारी) बहरीनमध्ये एसीसीची खास बैठक पार पडली. बैठकीत यावर्षीच्या आशिया चषकाविषयी महत्वाची चर्चा झाली असून जय शहा (Jay Shah) त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) पाकिस्तानमध्ये आयोजित होणार असे ठरले होते. पण बीसीसीआय एसीसीच्या या निर्णयाशी सहमत नसल्यामुळे काही महिन्यांपासून हा वाद सुरू आहे. बीसीसीआय सचिव आणि एसीसीसचे अध्यक्ष जय शहा यांनी भारतीय संघ अशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तनमध्ये जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. शनिवारच्या बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली असल्याचे समजते.
माहितीनुसार आशिया चषक 2023 साठी न्यूट्रल वेन्यू ठरवला जाणार आहे. यूएईमध्ये यावर्षीचा आशिया चषक आयोजित केला जाण्याची पूर्ण शक्यता आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार जय शहा भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी अजूनही तयार झाले नाहीत आणि यासाठी आशिया चषक एका न्यूट्रल वेन्यूवर आयोजित केला जाईल. असे असले तरी, याविषयी कुठलीही अधिकृत माहिती अजून समोर आली नाहीये. बीसीसीआय किंवा पीसीबीनेही याविषयी कुठलीच प्रतिक्रिया अद्याप दिली नाहीये.
माहितीनुसार पीसीबी अध्यभ नजम सेठी (Najam Sethi) यांनी तातडीने एसीसीची बैठक बोलावली होती आणि एसीसीने ही बैठक आयोजित देखील केली. बीसीसीआयकडून जय शहा बहरीनमध्ये या बैठकीसाठी पोहोचले होते आणि त्यांनी स्वतःची भूमिका ठामपणे मांडली. तत्पूर्वी पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा (Ramij Raja) याच मुद्यावरून चांगलेच चर्चेत आले होते. आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानमध्ये आला नाही, तर पाकिस्तान देखील आगामी विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही, असे वक्तव्य रमीज राजांनी केले होते. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध 2011 च्या मुंबई हल्ल्यानंतर अधिकच तापले. यानंतर भारतीय संघाने एकदाही पाकिस्तान दौरा केला नाही. (Jay Shah gave his strong stand regarding Asia Cup 2023 in the ACC meeting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संयम संपला! विनोद कांबळीविरोधात पत्नी अँड्रियाने नोंदवला गुन्हा, स्वतःच्या पोरासमोर केला जीवघेणा हल्ला
बालपणी आर्मीत जाण्याची स्वप्ने पाहणारा भुवी आज आहे भारताचा नामवंत क्रिकेटर, वाचा त्याच्याबद्दल १० खास गोष्टी