भारतीय संघ क्रिकेटच्या तीनही स्वरूपात सध्या जोरदार कामगिरी करत आहे. वनडे असो टी२० असो किंवा कसोटी क्रिकेट, या तिन्ही स्वरूपात भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. याचे कारण म्हणजे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly). सौरव गांगुली यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून भारतीय संघात अनेक मोठ मोठे बदल घडले आहेत. तसेच आता राहुल द्रविड यांना भारतीय वरिष्ठ संघांचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. आता लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) देखील बीसीसीआयमध्ये मोठी जबाबदारी देण्यात येऊ शकते, याचे संकेत जय शाह यांनी दिले आहेत.
द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी म्हटले आहे की, “राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपद आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला नॅशनल क्रिकेट ॲकेडमीच्या अध्यक्षांची जबाबदारी मिळाल्यानंतर सचिन तेंडूलकरला देखील लवकरच बोर्डाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. आम्ही त्यासाठी सचिन तेंडूलकरचे मन वळवण्याचा प्रयत्न करतोय.”
असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, सचिन तेंडुलकरला निवड समितीमध्ये एखादी भूमिका दिली जाऊ शकते. परंतु, याबाबत सचिन तेंडूलकरने कुठलीही अधिकृत माहिती दिली नाहीये.
भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी २०१९ मध्ये बीसीसीआय अध्यक्षांची जबाबदारी स्वीकारली होती. ते बीसीसीआयचे ३९ वे अध्यक्ष होते. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सीके खन्ना बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यांनी २०१७ ते २०१९ पर्यंत ही जबाबदारी पार पाडली होती. तसेच सीके खन्ना पूर्वी ही जबाबदारी अनुराग ठाकूर यांनी पार पाडली होती. सौरव गांगुलीबद्दल बोलायचं झालं तर सौरव गांगुली हे दुसरेच कर्णधार आहेत, ज्यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
हे नक्की पाहा :
ज्यावेळी सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी सचिन तेंडूलकरने ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या होता. त्यांनी लिहिले होते की, “त्याने ज्या पद्धतीने क्रिकेट खेळले, ज्या प्रकारे त्याने देशाची सेवा केली, मला शंका नाही की तो (बीसीसीआय अध्यक्ष म्हणून) त्याच क्षमतेने, उत्कटतेने आणि फोकसने आपली भूमिका पार पाडेल.”
महत्वाच्या बातम्या :
असंख्य अडचणींवर मात करत अहमदाबाद फ्रेंचायझी आयपीएलच्या रणसंग्रामासाठी सज्ज
रॉस टेलरचा कसोटी कारकीर्दीला ‘अविस्मरणीय’ अलविदा, अखेरच्या चेंडूवर घेतली विकेट, पाहा व्हिडिओ