टी20 विश्वचषकच्या यशानंतर राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन काठता पाय घेतला अर्थातच त्याचा कार्यकाळ संपला. त्याच्यानंतर गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. गंभीरने पदभार स्वीकारताच वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खूप फरक निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या संघही तयार केले जात आहेत. आता बीसीसीआयचे सचिव जय शहांनी गंभीरकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची जबाबदारी देण्याच्या माैन सोडले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जय शहांना विचारण्यात आले की, टीम इंडियाला तीन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगळे प्रशिक्षक देण्याबाबत विचार का करण्यात आला नाही? उत्तर देताना जय शहा म्हणाले “आम्ही एकदा प्रशिक्षकाची नियुक्ती केली की, त्याच्या निर्णयांची अंमलबजावणी आम्हाला करावी लागते. आम्ही गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे, जर त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये कोचिंग द्यायचे असेल तर , मी त्याला नको म्हणायला कोण आहे? सामान्यतः 70 टक्के खेळाडू तीनही फॉरमॅटमध्ये खेळत असतात.
पुढे जय शहांना विचारण्यात आले की, बॅकअप प्रशिक्षकाची गरज असल्यास काय निर्णय घेतला जाईल? यावर ते म्हणाले की, एनसीएमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक आहेत. याशिवाय त्यांनी एनसीए अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे उदाहरण सांगितले, जे राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसले होते.
नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात गौतम गंभीरने पहिल्यांदाच प्रशिक्षक म्हणून टीम इंडियाची कमान सांभाळली. टीम इंडियाला टी20 मालिका जिंकण्यात फारशी अडचण आली नाही. कारण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने यजमान संघाचा 3-0 असा पराभव केला. मात्र तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील 2-0 अशा पराभवामुळे गौतम गंभीरच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर पुढचे दोन सामने भारताने गमावले होते.
हेही वाचा-
रोहित-विराट दुलीप ट्रॉफी स्पर्धेत का खेळणार नाहीत? जय शहांनी सांगितले खरे कारण
“ज्यांना पदक हवंय त्यांनी 15 रुपयांत…”, विनेशची याचिका सीएएसने फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची पोस्ट
श्रीजेशने जर्सी तर मनूने दिली पिस्तूल, पंतप्रधान मोदींनी ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंची घेतली भेट