भारतीय क्रिकेटमधील अनेक क्रिकेटपटूंनी मागील काही काळात लग्न केले आहे. यात युजवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, विजय शंकर अशा काही क्रिकेटपटूंची गेल्या काही महिन्यांत लग्न झाली आहेत. आता यात जयंत यादवचाही समावेश झाला आहे.
जयंत यादवने त्याची प्रेयसी दिशा चावला बरोबर नुकतेच लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे वृत्त भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने दिली. चहलने सोशल मीडियावर जयंत आणि दिशाच्या लग्न सोहळ्यातील एक फोटो शेअर करत लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या.
Congratulations Jayant & Disha ❤️🤗 🧿 pic.twitter.com/u29JLQbqcW
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) February 16, 2021
तसेच आयपीएलमध्ये जयंत प्रतिनिधित्व करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघानेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सने त्याचा आणि दिशाचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘जयंत कॉट अँड बोल्ड बाय दिशा. अभिनंदन आणि नव्या भागीदारीसाठी शुभेच्छा.’
Jayant c & b Disha 💍
Congratulations and lots of luck for this new partnership 💙#OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/mqLGTlMvNE
— Mumbai Indians (@mipaltan) November 22, 2019
जयंतची कारकिर्द –
जयंत नुकताच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये हरियाणाकडून खेळला होता. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तो आयपीएल २०२० सालच्या अंतिम सामन्यातही मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. या सामन्यात त्याने शिखर धवनची महत्त्वाची विकेट घेतली होती.
जयंतने भारताचेही वनडे आणि कसोटी प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०१७ साली भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ४ कसोटी सामने आणि १ वनडे सामना खेळला आहे. कसोटीत त्याने एका शतकाहसह २२८ धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध १०४ धावांची शतकी खेळी केली होती. तर ४ कसोटी सामन्यात त्याने ११ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच १ वनडे सामन्यात त्याने १ विकेट घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीसोबत पत्नीला धरायचा होता ठेका, पण कॅप्टनकूल जागचा उठला सुद्धा नाही; पाहा पुढं काय झालं
इंग्लंडच्या माजी खेळाडूला पचला नाही पराभव, भारतीय संघाचे कौतुक करतानाही मारला ‘हा’ टोमणा
चार वर्षानंतर इंग्लिश फलंदाजाने ठोकले सलग तीन षटकार, पहिले नाव आश्चर्यचकित करणारे