---Advertisement---

पुजारा नंतर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने इंग्लंडमध्ये खेळण्याचा घेतला निर्णय

On: शुक्रवार, सप्टेंबर 2, 2022 11:22 PM
Team India 1
---Advertisement---

सध्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारताची कसोटी क्रिकेटमधील अभेद्य भिंत अर्थातच चेतेश्वर पुजारा हा तर आधीच काउंटी क्रिकेटमध्ये चमकत आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत भारताच्या आणखी एका खेळाडूने काउंटीच्या संघात प्रवेश केला आहे.

भारताचा फिरकीपटू जयंत यादव (Jayant Yadav) याने काउंटीमध्ये वॉर्विकशायर संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो काउंटी चॅम्पियनशीपच्या तीन सामन्यांसाठी इंग्लंडला जाणार आहे. त्याच्याबाबत वॉर्विकशायरचे अध्यक्ष म्हणाले, “जयंत एक उत्तम खेळाडू आहे. त्याचे वॉरविकशायरच्या संघात स्वागत आहे. त्याने यावर्षी कसोटी क्रिकेट खेळले आहे आणि त्याचा प्रथम श्रेणीतील अनुभव आमची गोलंदाजी अंतिम तीन सामन्यांमध्ये अधिक आक्रमक करेल.”

जयंतने 2016मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची फारच कमी संधी मिळाली. त्याने भारताकडून फक्त सहा कसोटी आणि दोन वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याने कसोटीमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक केले आहे. त्याने हे शतक इंग्लंडविरुद्धच 2016मध्ये वानखेडे स्टेडियमवर केले होते. तो वॉर्विकशायरमध्ये अष्टपैलूच्या रूपात दिसणार आहे. तर आता काउंटी क्रिकेटमध्ये तो कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल.

जयंतची काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी संघात खेळण्यास उत्सुक आहे. एजबस्टनचे नाव ऐकले आहे. मात्र तेथे मी एकदाही खेळलो नाही आणि आता त्याच स्टेडियमला माझे घर म्हणण्यास मला आनंद होत आहे.”

https://twitter.com/WarwickshireCCC/status/1565676087102918657?s=20&t=Kuihx8qtPD72c60Gag-m7A

पुजाराने काउंटीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने ससेक्सकडून खेळताना रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने 9 सामन्यांत 89.14च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने या स्पर्धेत फलंदाजाबरोबरच कर्णधाराचीही भुमिका चांगल्याप्रकारे पार पाडली आहे.

https://twitter.com/WarwickshireCCC/status/1565670372648914944?s=20&t=Kuihx8qtPD72c60Gag-m7A

पुजारा, जयंत यांच्याबरोबरच उमेश यादव, वॉशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज हे भारतीय खेळाडूही काउंटी क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या संघाकडून खेळत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---