सध्या संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. देशभरातील परिस्थिती गंभीर असली तरी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा १४ वा हंगाम भारतातील विविध शहरांमध्ये सुरु आहे. या कठीण समयी अनेक खेळाडू आता मदतीसाठी सरसावले आहेत. त्यामध्ये, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याचेही नाव आता सामील झाले आहे.
ट्विट करत पोस्ट केला व्हिडिओ
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणारा सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकट याने भारतातील आरोग्य यंत्रणेला मदत म्हणून रक्कम देण्याची घोषणा केली. त्याने, पोस्ट केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले, ‘मी माझ्या आयपीएल रकमेतील १०% रक्कम वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी देत आहे. माझे कुटुंबीय ही मदत योग्य ठिकाणी पोहोचवतील. आपले जय हिंद!’
I am contributing 10% of my IPL salary towards providing essential medical resources for those in need. My family will make sure it reaches the right places. Jai Hind! pic.twitter.com/XvAOayUEcd
— Jaydev Unadkat (@JUnadkat) April 30, 2021
या व्हिडिओमध्ये बोलताना उनाडकट म्हणाला, “गेल्या काही आठवड्यांपासून मला वाटत असलेली एक गोष्ट मी शेअर करू इच्छितो. आपला देश बर्याच संकटांतून जात. मला माहित आहे की वैयक्तिक नुकसान किती वेदनादायक असू शकते आणि आपल्या जिवलग मित्रांच्या जीवनासाठी लढा देणे हे किती चिंताजनक असते. मी दोन्ही घटनांमधून गेलो आहे. सध्या क्रिकेट खेळणे योग्य किंवा अयोग्य हे माहीत नाही. परंतु, मला प्रामाणिकपणे असे वाटते की, या परिस्थितीत कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहणे कठीण असते. मला एवढेच वाटते की या अनिश्चित काळात हा खेळ खूप अनेकांना आनंद देतो. चला आपण सर्वजण एकत्र येऊ या, जे जे काही शक्य आहे त्या प्रकारे एकमेकांना हातभार लावू आणि मदत करूया.”
राजस्थान रॉयल्स त्याला एका हंगामासाठी ३ कोटी रुपये इतकी रक्कम देते. याचाच अर्थ उनाडकट कोविड रुग्णासाठी ३० लाख रुपये इतकी मदत करेल.
या खेळाडूंनी केली आहे मदत
केकेआरचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सर्वप्रथम या रुग्णांच्या मदतीसाठी ३७ लाख रुपये रक्कम दिली होती. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने ७.५० कोटी रुपये दान केले आहेत. एमएस धोनी, निकोलस पूरन, सचिन तेंडुलकर, रविंद्र जडेजा व हरभजन सिंग यांनी विविध प्रकारे रुग्णांपर्यंत आपली मदत पोहोचवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला देखील संपूर्ण कारकिर्दीत हे जमले नाही”, दिग्गजाने केली पृथ्वी शॉची प्रशंसा
खेळाडू म्हणून ६ पैकी ६ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू






