---Advertisement---

“त्याला नक्कीच मोठे सिक्रेट्स माहित असणार”, राजस्थानने उनाटकटला संघात कायम केल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 5:35 PM
---Advertisement---

आयपीएल 2021 च्या हंगामाचे बिगूल वाजले आहेत. बुधवारी(20 जानेवारी) आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व फ्रांचायझींनी त्यांच्या संघात 2021 च्या हंगामासाठी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अनेक संघांनी मोठ्या खेळाडूंना मुक्त करुन आश्चर्याचे धक्के दिले आहेत. यात राजस्थान रॉयल्स संघाचाही समावेश आहे. राजस्थानने अनेक आश्चर्याचे धक्के त्यांच्या चाहत्यांना बुधवारी दिले. राजस्थानने त्यांचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला मुक्त केले असून संजू सॅमसनला नवा कर्णधार केले आहे.

त्यांनी संघात एकूण  17खेळाडूंना संघात कायम केले आहे. यात संजू सॅमसन, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, रॉबिन उथप्पा, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, अनुज रावत, रियान पराग, महिपाल रोमरोर, श्रेयस गोपाळ आणि मनन वोहरा या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

राजस्थानने ज्यावेळी संघात कायम केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली, त्यानंतर त्यांचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. कारण गेल्या २ वर्षी त्यांनी उनाडकटला संघातून लिलावाआधी मुक्त करत पुन्हा लिलावात खरेदी करुन संघात घेतले होते. त्यामुळे त्याला यावेळी संघात कायम केल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

https://twitter.com/Safrid283/status/1352180016990150656

https://twitter.com/_iamashu_/status/1352159526644899842

https://twitter.com/tusharyadav194/status/1352151056231313408

दोन मोसमातील महागडा खेळाडू. 

साल 2017च्या आयपीएलमध्ये उनाडकटने रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना 12 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो 2018च्या वर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला  2018 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने 11.5 कोटीमध्ये संघात घेतले होते. पण 2018 आयपीएलच्या हंगामात उनाडकतने फारसी चांगली कामगिरी केली नव्हती. त्याने 15 सामन्यात 44.18च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणून राजस्थानने त्याला मुक्त केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा उनाडकटला 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात परत घेतले. त्यामुळे तो 2018 आणि2019 च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

त्यानंतरही राजस्थानने त्याला पुन्हा आयपीएल 2020 च्या लिलावाआधी मुक्त केले होते आणि लिलावात 3 कोटींची बोली लावत पुन्हा संघात सामील करुन घेतले होते. त्यामुळे यंदा मात्र त्यांनी त्याला संघात कायम ठेवल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला ‘तो’ गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

विमानतळावरुन सिराजने धरली थेट स्मशानभूमीची वाट अन् वडिलांना वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून पाणावतील डोळे

आरसीबी संघाने करारमुक्त केल्यावर पार्थिव पटेलने ट्विटरवर व्यक्त केल्या भावना, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---