इंग्लंड येथे सध्या ‘द हंड्रेड’ क्रिकेट स्पर्धेची मोठी चर्चा आहे. पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेत अनेक पुरुष आणि महिला खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली आहे. यात भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जचाही समावेश आहे. तिने या स्पर्धेत तिचे तिसरे अर्धशतक लगावले आहे. पण असे असले तरी ती ज्या संघाचे प्रतिनिधित्व करतो त्या नॉर्दर्न सुपर चार्जर्स संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना मंगळवारी (३ ऑगस्ट) करावा लागला आहे.
मंगळवारी लंडन स्पिरिट संघाविरुद्धच्या या सामन्यात नॉर्दर्न सुपर चार्जर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सुपर चार्जर्सची सुरुवात खराब झाली. कर्णधाक विनफिल्ड हिल अवघ्या १ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र फॉर्मात असलेल्या रॉड्रिग्जने एका बाजू लावून धरत डावाची सूत्रे हाती घेतली. तिने वेगवान फलंदाजी केली आणि स्पर्धेत तिसऱ्यांदा अर्धशतक झळकावले. रॉड्रिग्जने ४४ चेंडूत ५७ धावा केल्या.
रॉड्रिग्जच्या या अर्धशतकामुशे सुपर चार्जर्सने १०० चेंडूत ५ बाद १२६ धावा केल्या. लंडन स्पिरिटकडू सोफी मुनरोने सर्वाधिक २ बळी घेतले.
This is @JemiRodrigues at her brilliant best! 🤩
She's #TheHundred's top runs scorer for a reason! pic.twitter.com/qFitQwhgeL
— The Hundred (@thehundred) August 3, 2021
त्यानंतर प्रतिउत्तरादाखल उतरलेल्या लंडन स्पिरीट संघाने ९८ चेंडूत ३ बाद १२९ धावा करत सामना ७ विकेट्सने जिंकला. शेवटच्या पाच चेंडूत लंडन संघाला ७ धावांची गरज असताना डिटेंड्रा डॉटिनने सलग दोन चौकार मारले आणि तीन पराभवानंतर आपल्या लंडन स्पिरिट संघाला विजयाची चव चाखण्याची संधी दिली. डॉटिनने ३४ चेंडूत ८ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. तसेच मी ब्यूमोंटने लंडन स्पिरिटकडून चांगला खेळ केला. तिने ४२ धावा केल्या. त्याचबरोबर डॉटिनबरोबर ५६ धावांची उपयुक्त भागीदारी केली.
शेवटच्या १३ चेंडूत २० धावा हव्या असताना सामना रोमांचक होत होता. पण डॉटिनने दुस-या टोकाला उभी राहत आपल्या डावाला गती दिली. शेवटच्या दोन चौकारांमुळे सुपर चार्जर्सला २ चेंडू शिल्लक असताना पराभव पत्करावा लागला. एकूण पाच सामन्यांत सुपर चार्जर्सचा हा पहिलाच पराभव होता. सुपर चार्जर्सने याआधीचे तीन सामने जिंकले आहेत आणि एक सामन्याचा निकाल लागलेला नाही. दुसरीकडे लंडन स्पिरिटच्या संघाला ५ सामन्यांत दुसऱ्यांदा विजयाची संधी मिळाली आहे.
It's a third 5️⃣0️⃣ of #TheHundred for @JemiRodrigues!
What. A. Player. pic.twitter.com/0kUijMXoue
— The Hundred (@thehundred) August 3, 2021
या स्पर्धेत जेमिमा रॉड्रिग्ज चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. ती स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज देखील आहे. तिने आतापर्यंत ४ सामने खेळले असून २२३ धावा चोपल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजचा हा ‘चॅम्पियन’ क्रिकेटर घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
जिगरबाज! भर मैदानात होऊ लागल्या उलट्या, तरीही ‘या’ गोलंदाजाने पूर्ण केलेले षटक