---Advertisement---

बॉक्सिंग चॅम्पियन वडिलांना जे जमलं नाही, ते १९ वर्षांच्या लेकाने करून दाखवलं, थेट ‘गोल्ड’ आणले घरी

On: रविवार, जुलै 31, 2022 6:25 PM
Jeremy Lalrinnunga
---Advertisement---

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ ( Commonwealth Games) या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताने पाचवे पदक जिंकले. युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. युवा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या जेरेमीने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये १४० किलो वजन उचलत त्याने कॉमनवेल्थ गेम्समधील विक्रमही केला. त्याचवेळी जेरेमीने क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलले. तसेच त्याने बॉक्सिंग चॅम्पियन वडीलांचे स्वप्नदेखील पूर्ण केले आहे.

स्नॅच प्रकारानंतर क्लीन एंड जर्क प्रकाराच्या पहिल्या फेरीत जेरेमी लालरिनुंगा (Jeremy Lalrinnunga) याने १५४ किलो वजन उचवले. तर दुसऱ्या फेरीत १६० किलो वजन उचलत पदक निश्चित केले. १६५ किलोच्या तिसऱ्या प्रयत्नावेळी तो अपयशी ठरला. मात्र आघाडीमुळे त्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

जेरेमीचे वडील होते बॉक्सिंग चॅम्पियन

लहानपणापासूनच घरात खेळाचे वातावरण राहिले. त्याचे वडील लल्नेइहट्लुआंगा ज्युनियर बॉक्सर चॅम्पियन होते. मात्र त्यांना देशाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. जेरेमी म्हणतो, “त्याचे वडीलच त्याचे प्रेरणास्थान आहेत. मी जेव्हा वेटलिफ्टिंग निवडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनीच मला साथ दिली. ते बॉक्सर होते, म्हणून त्यांना खेळाडूविषयी जाण होती. ते ज्युनियर स्तरावरील बॉक्सर होते, मात्र त्यांना कधीच भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करत आहे.”

जेरेमीने युवा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत सगळ्यांना आश्चर्यचकीत केले होते. त्या स्पर्धेत तो सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. त्याने २०११मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याचे वडील त्याच्यासोबत सराव करत असत. सुरूवातीला जेरेमीलाही बॉक्सर बनण्याची इच्छा होती, तेव्हा त्याच्या गावात मणिपूर येथे वेटलिफ्टिंगची ऍकडमी सुरू झाली. त्यानंतरच त्याने वेटलिफ्टिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1553690147589222401?s=20&t=VXWH-u_nSmMjb1LfutzEfg

वयाच्या १५व्या वर्षीच जागतिक स्तरावर केली ओळख निर्माण-

जेरेमीने बर्मिंघमच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण कामगिरी केली असली, तरी त्याने वयाच्या १५व्या वर्षीच युवा ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव चमकवले आहे. या स्पर्धेनंतर टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकसाठी तो अपात्र ठरला. त्यानंतर त्याने कठोर मेहनत घेण्याचे ठरवले दरम्यान त्याला दुखापतही झाली होती. . त्यामुळेच तो एशियन चॅम्पियनशीपमध्ये आठव्या स्थानावर राहिला. गुडघ्याच्या दुखापतीनंतर परतताना त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये इतिहास रचला आहे.

मीराबाई चानूनंतर जेरेमीने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी केली. कॉमनवेल्थ गेम्सच्या पदकतालिकेत भारत ५ पदकांसह सहाव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत २ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पुन्हा एकदा एकाच वेळी खेळणार दोन टीम इंडिया! ‘हे’ असू शकतात कर्णधार

रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर

CWG Breaking: अवघ्या १९ व्या वर्षी जेरेमीने रचला इतिहास! जिंकले कॉमनवेल्थ गोल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---