---Advertisement---

गुडन्यूज आली रे! महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 11:56 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू मेगन शटच्या घरी एका नव्या छोट्या परीने आगमन केले आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर ही दिली आहे. तिची साथीदार जेस होलोकने एका मुलीला जन्म दिला आहे. तिने मुलीचे नाव देखील ठेवले आहे. ज्याची माहिती मेगनने दिली. तिने सांगितले की, मुलीचे नाव राइली लुईस शट असे ठेवले आहे.

मेगनने सांगितले की, राईलीचा जन्म १७ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास झाला. मेगनने तिच्या मुलीची संपूर्ण माहिती दिली. तिचे वजन किती आहे आणि तिचा जन्म २८ आठवडे ६ दिवसांनी झाला, हे सर्व सांगितले आहे. मेगनने २०१९ मध्ये तिच्या दीर्घकालीन पार्टनर जेस होलोएकशी लग्न केले होते.

या वर्षी मे महिन्यात मेगनने तिच्या जोडीदाराच्या प्रेग्नन्सी विषयी देखील माहिती दिली होती. ती तिच्या पार्टनर जेससोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. तिच्या मुलीचा जन्म आपत्कालीन सी-सेक्शनद्वारे झाला असे २८ वर्षीय मेगनने सांगितले आहे. तिने तिच्या जोडीदाराचे कौतुक केले आणि भविष्यात ती किती चांगली आई असेल, हे देखील सांगितले.

https://www.instagram.com/p/CS00fsNp7q_/

वेगवान गोलंदाजाने लिहिले की, ‘राइली लुईस शट – १७ ऑगस्ट २०२१ रोजी, रात्री १०:०९ वाजता जन्मली. २८ आठवडे ६ दिवसांनंतर तिचा जन्म झाला. तिचे वजन ८५८ ग्रॅम भरले.’ मुलीच्या जन्मानंतर तिने सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

तिने लिहिले की, “आमच्या मुलीचा जन्म सी-सेक्शनद्वारे झाला. २४ आठवड्यांपासून आम्हाला सांगण्यात आले की, ती काही गुंतागुंतीच्या कारणामुळे कोणत्याही क्षणी या जगात येऊ शकते. म्हणून, जवळपास ५ आठवड्यांसाठी आम्ही आमच्या रात्रभर बॅग पॅक केल्या आणि आम्ही विचार करत होती की आम्ही किती दूर जावू शकतो. या सगळ्याचा एक भाग होणं अविश्वसनीय आहे. मी माझ्या पत्नीबद्दल अभिमान व्यक्त करत आहे. मला माहित आहे की, ती किती छान आई असेल. मी खूप नशिबवान आहे की, मला माझ्या आयुष्यात दोन सुंदर मुली मिळाल्या आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या – 

राहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आहे आघाडीवर

शिखर धवनची चुकीची इंग्रजी ऐकून विराटसह संघसहकारी झाले होते लोटपोट, वाचा तो किस्सा

पाकिस्तानला झटका! फलंदाजी करताना फवाद आलम कोसळला खेळपट्टीवर, रिटायर्ड हर्ट होऊन जावे लागले मैदानाबाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---