झारखंड आणि नागालंड यांच्यात कोलकातामध्ये रणजी ट्रॉफी २०२२ चा उप उपांत्यपूर्व सामना खेळला जात आहे. झारखंडचा १७ वर्षीय युवा फलंदाज कुमार कुशाग्रने या सामन्यात धमाकेदार द्विशतक करून मोठा विक्रम केला आहे. कुशाग्र आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज बनला आहे. तसेच पाकिस्तानचे जावेद मियांदाद आणि भारताचा यष्टीरक्षक फलंंदाज ईशान किशन याचा विक्रमही त्याने मोडला आहे.
कुमार कुशाग्रने विक्रमांचा घातला रतीब
यष्टीरक्षक फलंदाज कुमरा कुशाग्र (Kumar Kushagra) याने या उप उपांत्यपूर्व सामन्यात २७० चेंडूत २६६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ३७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. कुशाग्रने ही कामगिरी १७ वर्ष आणि १४१ दिवस पूर्ण झाल्यावर केली आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद (Javed Miandad) यांनी १७ वर्ष आणि ३११ दिवसांच्या वयात ही कामगिरी केली होती. तसेच भारतीय खेळाडूंमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) याने १८ वर्ष आणि १११ दिवसांचा असताना अशी खेळी केली होती.
ICYMI: 2⃣6⃣6⃣ off 2⃣6⃣9⃣ with 3⃣7⃣ fours & 2⃣ sixes 👏👏
Jharkhand's Kumar Kushagra set the stage on fire 🔥 🔥 & scored a mighty double hundred. 💪 💪 #RanjiTrophy | #PQF | #JHAvNAG | @Paytm
Watch that superb knock 🎥 🔽https://t.co/vHILpI845T pic.twitter.com/y1nRijViiI
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2022
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यापूर्वी ईशान किशनच्या नावावर झारखंडसाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम होता. त्याने २०१६ मध्ये दिल्ली विरुद्धच्या सामन्यात झारखंडसाठी २७३ धावा केल्या होत्या. आता या यादीत ईशाननंतर कुशाग्रचे नाव आले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कुशाक्रचे हे पहिले दुहेरी शतक आहे. कुशाक्र २०१९ मध्ये वीनू मांकड ट्रॉफीमध्ये सर्वप्रथम चर्चेत आला होता. त्याने त्यावेळी ७ सामन्यांमध्ये सर्वाधिक ५३५ धावा केल्या होत्या.
2⃣0⃣0⃣ up and going strong! 👏 👏
That moment when Jharkhand wicketkeeper-batter Kumar Kushagra brought up a double ton. 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/Ng12bS6Sw5#RanjiTrophy | #PQF | #JHAvNAG | @Paytm pic.twitter.com/yhAbhqBiko
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, 2022
कुमार कुशाग्रबद्दल थोडेसे…
कुशाग्रचे वडील शशिकांंत जीएसटी डिपार्टमेंटमध्ये जिल्हा आयुक्त आहेत. कुशाग्रसाठी त्यांनी स्वतःच्या घरात क्रिकेटचे ग्रंथालय बनवल्याची माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने शशिकांत यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “मी माझ्या घरात क्रिकेटच्या पुस्तकांचे ग्रंथालय बनवले, ज्यामध्ये ब्रॅडमनपासून स्टीव वॉ यांची पुस्तके आहेत. मी नेट्समध्ये जाऊन खेळाडूंचा शैली पाहायचो की, ते कशा पद्धतीने खेळत आहेत. त्यानंतर मी त्याच गोष्टी पुस्ताकात वाचायचो. मी त्याच पद्धतीने कुमारकडून सराव करून घ्यायचो.”
झारखंडचा संघ मजबूत स्थितीत
दरम्यान, मनिपुरविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात झारखंड भक्कम स्थितीत आहे. कुशाग्रव्यतिरिक्त विराट सिंग (१०७) आणि शाहबाज नदीम (१७७) यांचीन मोठी खेळी केली. पहिल्या डावात झारखंडने ८८० धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात नागालंडने ३७ धावांवर त्यांच्या महत्वाच्या दोन विकेट्स गमावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
भारताचा ‘तोडफोड’ फलंदाज! बंगळुरू कसोटीत २८ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या पंतवर कौतुकाचा वर्षाव
पाकिस्तानला ९ धावांनी धूळ चारत बांगलादेशने साकारला ऐतिहासिक विजय; काय आहे खास, वाचा
मार्च १४, २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!