यजमान इंग्लंड महिला क्रिकेट संघ आणि भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्यादरम्यान बुधवारपासून (१६ जून) एकमेव कसोटीला सुरुवात झाली. ब्रिस्टल येथील ब्रिस्टल काउंटी ग्राउंड या मैदानावर हा सामना खेळला सुरू आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करणारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने गोलंदाजीतील एका आगळ्यावेगळ्या विक्रमाला गवसणी घातली.
अशी कामगिरी करणारी झुलन एकमेव भारतीय गोलंदाज
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडू असलेली भारताची वेगवान झुलन गोस्वामी आपल्या कारकीर्दीतील ११ वा कसोटी सामना खेळण्यासाठी ब्रिस्टलच्या मैदानात उतरली. या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना तिने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये २००० चेंडू टाकणारी पहिली गोलंदाज होण्याचा मान मिळवला.
झुलनने या सामन्यात मैदानावरून उतरण्यापूर्वी १० कसोटीमध्ये १९७२ चेंडू टाकले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील पाचव्या शतकातील चौथा चेंडू टाकताना तिने २००० चेंडू टाकण्याची कामगिरी पूर्ण केली.
या यादीमधील इतर गोलंदाज
झुलन गोस्वामीनंतर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकण्याची कामगिरी मध्यमगती गोलंदाज अमिता शर्मा हिने केली आहे. तिच्या नावे ५ कसोटी सामन्यात ७४८ चेंडू जमा आहेत. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी रूमेली धर हिचा क्रमांक लागतो. तिने ४ कसोटी सामने खेळत ५५२ चेंडू टाकले होते. चौथ्या स्थानी असलेल्या रेणू मार्गारेट यांनी भारताकडून कसोटीमध्ये ५०४ टाकले आहेत. (Jhulan Goswami bowl 2000 test bowls in test cricket)
झुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
झुलन गोस्वामी हिने २००२ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. तिने कसोटीत ४०, वनडे क्रिकेटमध्ये २३३ व टी२० मध्ये ५६ बळी मिळवले आहेत. तिला २००७ मध्ये आयसीसीची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. झुलनने काही काळ भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या प्रारुपाविषयी उपस्थित केला प्रश्न, म्हणाला…
WTC फायनल गाजण्यासाठी ‘भारत आर्मी’ तयार, आयसीसीने स्वतः पोस्ट केला व्हिडिओ
जेव्हा धोनीची मुलगी सीएसकेला नाही तर मुंबई इंडियन्सला करते चिअर, रोहित शर्माने शेअर केला व्हिडिओ