---Advertisement---

‘तर भारत मायदेशात डीआरएस वापरावर बंदी आणू शकतो’, न्यूझीलंडच्या अष्टपैलूने घेतली फिरकी

---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियामवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने त्यांच्या पहिल्या डावात एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या. दुसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान भारतीय पंचांनी न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला तीन वेळा बाद करार दिला, पण डीआरएसच्या मदतीने त्यान तिन्ही वेळा पंचांचा निर्णय चुकीचा ठरवला आणि दिवसाचा शेवट होईपर्यंत खेळपट्टीवर कायम राहीला. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशमने एक मजेशीर ट्वीट केले आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लाथमने (५०) आणि विल यंग (७५) यांनी शतकी भागीदारी केली. यादरम्यान पंचानी सहा वेळा चुकीचा निर्णय दिला, जो त्यांना नंतर बदलावा लागला. यामध्ये सलामीवीर टॉम लाथनने त्यांचे तीन निर्णय चुकीचे ठरवले. याबाबत जिमी निशमने ट्वीट करत भारतीय संघाची फिरकी घेतली आहे.

त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “जर येथे टॉम लाथमने शतक केले, तर भारत मायदेशात डीआरएसचा वापर करण्यावर बंदी आणू शकतो.” या सामन्यानंतर लाथम कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात तीन वेळा पंचाचा निर्णय चुकीचा ठरवणारा फलंदाज ठरला आहे.

दरम्यान, भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. भारतीय संघ दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर सर्वबाद झाला आणि न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात झाली. भारतासाठी या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने १०५ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा (५०) आणि शुभमन गिलने (५२) अर्धशतक केले.

न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशीच्या खेळ संपेपर्यंत १२९ धावा केल्या अशून संघ भारतापेक्षा २१६ धावांनी विछाडीवर आहे.  दुसऱ्या दिवसाचा शेवट होईपर्यंत न्यूजीलंड संघाचे सलामीवीर खेळपट्टीवर कायम होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

लहानपणी अनेकवेळा रॅगिंग झालेला तरीही न खचता पुढे भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक झालेला रैना

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा १२ वा खेळाडू मैदानात, ‘या’ कारणामुळे साहाऐवजी केएस भरतला यष्टीरक्षणाची संधी

‘पदार्पणाचे हे दोन दिवस आयुष्यभर माझ्यासोबत राहतील’, श्रेयस अय्यरने शेअर केली भावुक पोस्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---