भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहने मार्च महिन्यात चाहत्यांना त्याच्या लग्नाची आनंदाची बातमी दिली होती. मार्चदरम्यान, बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी उपस्थित नव्हता, त्यावेळी तो लग्न करणार असल्याच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आणि बुमराहने क्रीडानिवेदक असलेल्या संजना गणेशनबरोबर लग्न केल्याचे जाहीर केले. तेव्हापासून या जोडप्याची चर्चा बऱ्याचदा होत असते.
नुकताच संजनाने ६ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त बुमरागने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती. त्याने दोघांचा एक गोड फोटो शेअर केला होता, ज्यात संजना त्याला किस करताना दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले होते की “त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, जी रोज माझे हृदय चोरते. तू माझी आहेस. आय लव्ह यू.”
Happy birthday to the person who steals my heart everyday. You’re my person, I love you. ❤ pic.twitter.com/4QuIPUL1kX
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) May 6, 2021
बुमराहने ही पोस्ट केल्यानंतर इंस्टाग्रामवर न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जिमी निशामने त्यावर कमेंट करत ट्रोल केले. निशामने कमेंट केली की ‘एक मिनिटासाठी मला वाटले की तू ट्रेंट बोल्टबद्दलच बोलत आहेत.’
खरंतर बुमराह, बोल्ट आणि निशाम हे तिघेही सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. बुमराह गेले अनेक वर्षांपासून मुंबईचा भाग आहे, तर बोल्ट मागीलवर्षी आणि निशाम यावर्षी मुंबई संघात सामील झाला आहे. त्यामुळे या तिघांमध्ये मैत्री आहे. तसेच बोल्ट आणि बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल वेगवान गोलंदाज मानले जातात. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळतानाही त्यांच्यात झालेली मैत्री दिसून आली आहे. अनेकदा हे दोघे एकत्र खेळताना चर्चा करताना दिसले आहेत.
मागीलवर्षी मुंबई इंडियन्सने ५ वे विक्रमी आयपीएल विजेतेपद जिंकण्यात बोल्ट आणि बुमराहचा मोठा वाटा होता. या दोघांनी मिळून मागीलवर्षी ५२ विकेट्स घेतल्या होत्या.
सध्या आयपीएल २०२१ चा हंगाम कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या उर्वरित १४ व्या हंगामाचे आयोजन होणार इंग्लंडमध्ये? पाहा काय आहे प्रकरण
आठवणीतील सामना! जेव्हा रोहित शर्माने आयपीएलमध्ये घेतली होती हॅट्रिक, वाचा त्या सामन्याबद्दल सविस्तर